आयुष्यात कधी कधी विचित्र संकट येऊन उभं राहतं जसे सध्याचा काळ. ही वेळ देखील निघून जाईल परंतू या दरम्यान येणारा ताण किंवा निराशामुळे आजार होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. अश्या वेळेस त्या तणावापासून बाहेर पडण्यासाठी स्वतःचा मूड चांगला ठेवणे गरजेचे असते. तर ताण दूर करण्यासाठी हे करून बघा-
* सकारात्मक व्हा - कधी कधी अशी स्थिती होते की माणूस संकटाच्या वेळी नकारात्मक विचार करू लागतो. असे करणे टाळावं. नेहमीच अडचणीतून मार्ग मिळतो आणि मिळेल असे सकारात्मक विचार ठेवावे आणि नैराश्याला आपल्यापासून लांब ठेवावे.
* कामाकडे लक्ष द्यावे - काही वेळा आपले मूड किंवा मन खराब असले की काहीही करावेसे वाटत नाही. असे करू नका. आपले मन आणि लक्ष्य कामाकडे केंद्रित करून आपला वेळ घालावा. कामाला प्राधान्य द्या.
* मेडिटेशन करा - मेडिटेशन करून आपल्याला कामाच्या तणावांपासून मुक्ती मिळेल यासाठी तणावाच्या स्थितीमध्ये दीर्घ श्वसन घ्यावे असे केल्याने तणावापासून दूर राहतो आणि आरोग्य चांगले राहते.
* विनोदी कार्यक्रमाला प्राधान्य द्या - कधी कधी अत्यधिक कामाच्या ताणामुळे चिडचिड होते आणि नैराश्य येते. अशा वेळी एखादा विनोदी कार्यक्रम किंवा चित्रपट बघितल्याने तुमचा मूड चांगला होऊन कामासाठी उत्साह येईल आणि नैराश्य दूर होईल.
* गाणी म्हणा व ऐका - स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी आणि ताण तणाव दूर करण्यासाठी आपल्याला आवडेल ती गाणी म्हणा आणि ऐका आणि आनंद घ्या.
* दुसऱ्यांशी संवाद साधा - कधी कधी नैराश्यामुळे एकटे राहावेसे वाटते. मूड खराब असल्यास एकटे राहू नका दुसऱ्यांना फोन करून, गप्पा करून स्वतःला आनंदी ठेवा. अश्या वेळेस एखाद्या गरजूला मदतीचा हात द्या. करून बघा आपल्याला चांगले वाटेल.
* आवडते पदार्थ बनवा आणि खा - ताण असल्यास पोट शांत असणे गरजेचे असते. पोटाला शांत करण्यासाठी आपल्याला आवडेल ते पदार्थ बनवा त्यामुळे आपले मन शांत होईल आणि ताण देखील कमी होईल.
* नियमित व्यायाम करा - दररोज नियमित व्यायाम करणे फायदेशीर असते. जमेल इतकं शारीरिक व्यायाम केल्याने मन शांत राहते आणि आरोग्य सुधारते.
* विश्रांती घ्या - ताण जर शारीरिक असेल तर विश्रांती घेणे सर्वोत्तम ठरेल. पुरेशी झोप घेणे फायद्याचं ठरेल. याने मानसिक आणि शारीरिक स्वस्थता मिळते आणि आरोग्य उत्तम राहते.
* चिडू नका - कामाच्या ताणामुळे चिडचिड होणे सहज असते. पण असे करू नका त्याचा दुष्प्रभाव आपल्या शरीरावर पडू शकतो. कारण नसताना क्रोध करणे योग्य नाही.