Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

World Heart Day 2023 : या 7 प्रकारे तुमच्या हृदयाची काळजी घ्या

heart
World Heart Day : कोरोना महामारीमुळे आपल्या सर्वांसमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे स्वतःला निरोगी ठेवण्याची. होय, सध्याच्या काळात स्वत:ला निरोगी ठेवणे हे आव्हानापेक्षा कमी नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रत्येकाने स्वत:ची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण हृदयाशी संबंधित आजारांच्या संपर्कात येणे टाळू शकतो.
 
इतकेच नाही तर ज्यांना आधीच हृदयाशी संबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी सावधगिरी बाळगणे अधिक महत्वाचे आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला ह्रदयाशी निगडीत काही तथ्ये आणि ह्रदयविकारापासून बचावासाठी काही उपाय सांगत आहोत.
 
हृदय निरोगी ठेवण्यासाठी टिप्स-
 
1. आपण दररोज नियमाने 30 मिनिट मॉर्निंग वॉक केल्यास हृदय निरोगी राहील.
 
2. अनेकदा लोक वेळ नसल्याची तक्रार करतात परंतु निरोगी जीवनासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे.
 
3. डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे एंटी-एक्‍सीडेंट फ्री रेडिकल्‍समुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. यामुळे हृदयाच्या पेशींना होणारे नुकसान कमी होते. त्यामुळे डार्क चॉकलेटचे सेवन जरूर करा.
 
4. दररोज सकाळी फळांचे सेवन करा. त्यात आढळणारे फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो.
 
5. नट्सचे सेवन नक्की करा. अक्रोड, बदाम, पिस्‍ता विशेष रूपाने हृद्यासाठी फायद्याचे आहे.
 
6. नियमाने एक्‍सपर्टकडून मार्गदर्शन घेत व्यायाम करा.
 
7. अनहेल्दी फूड घेण्याची सवय सोडून आपल्या आहारावर विशेष लक्ष द्या.
 
हृदयाशी संबंधित रोचक तथ्ये-
 
- निरोगी व्यक्तीमध्ये हृदयाचे ठोके पडण्याचे प्रमाण एका दिवसात सुमारे 1,15,200 वेळा असे आहे.
 
- हृदय शरीराच्या सर्व 75 ट्रिलियन पेशींना रक्त पोहोचवते.
 
- हे तुम्हाला विचित्र वाटेल, परंतु पुरुषांच्या हृदयाचे ठोके महिलांच्या तुलनेत 10 टक्के अधिक वेगाने होतात.
 
- दररोज फक्त हसल्याने तणाव 50 टक्के कमी होतो. त्यामुळे हृदयावरही कमी परिणाम होतो.
 
- कार्डियक अरेस्‍ट झाल्यावर CPR च्या मदतीने रुग्णाला वाचवता येऊ शकतं. परंतु CPR केवळ 10 मिनिटात द्याचं असतं.
 
अस्वीकरण: औषध, आरोग्याशी संबंधित उपाय, योग, धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेबदुनियावर प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Heart Day 2023: हृदयरोग कशामुळे होतो, प्रकार, लक्षणे आणि उपचार