Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रात्री वारंवार लघवीसाठी उठावं लागत असेल तर असू शकते 'ही' समस्या

रात्री वारंवार लघवीसाठी उठावं लागत असेल तर असू शकते 'ही' समस्या
माझ्या मित्राचे आईवडील एक दिवस माझ्याशी बोलताना सांगत होते की, त्यांना रात्री नीट झोप येत नाही. ते वयस्कर आहेत आणि त्यांना रात्री लघुशंकेसाठी बऱ्याचदा झोपेतून उठावं लागतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर त्यांना ताजंतवानं वाटत नाही.
 
अनेकांची ही तक्रार असते. पण एक नैसर्गिक क्रिया म्हणत याकडे जर दुर्लक्ष करू नका. कारण या समस्येला ‘अॅडल्ट नॉक्टुरिया’ असं म्हटलं जातं.
 
इंटरनॅशनल कॉन्टिनन्स सोसायटीच्या मते, तुम्हाला रात्री किमान दोनवेळा लघवीसाठी उठावं लागत असेल तर त्याला ‘अॅडल्ट नॉक्टुरिया’ असं म्हणतात.
 
या समस्येचा झोपेवर आणि एकूणच आयुष्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. वाढत्या वयाबरोबर ही समस्या उद्भवते.
 
एका अंदाजानुसार 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे पाचपैकी तीन जण या समस्येने ग्रस्त आहेत.
 
ही समस्या लहान वयातही उद्भवू शकते.
 
यामागे काय कारणं?
नॉक्टुरिया दोन मुख्य कारणांमुळे होऊ शकतो. मूत्राशयाची क्षमता कमी होणं आणि लघवीचं प्रमाण वाढणे (पॉलियुरिया).
 
पहिल्या कारणाबाबत बोलायचं झाल्यास मूत्राशयाची क्षमता 300-600 मिली इतकी असते. दोन घटकांनी ही कमी होऊ शकते.
 
शारीरिक बदल: पुरुषांमध्ये हे सहसा सौम्य प्रोस्टेटिक हायपरट्रॉफीमुळे होते आणि स्त्रियांमध्ये लठ्ठपणा आणि पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्समुळे होते. यामुळे ओव्हर अॅक्टिव्ह ब्लॅडर सिंड्रोम आणि सिस्टिक इन्फेक्शन इत्यादी समस्या दिसून येतात.
नॉक्टुरिया जर पॉलियुरियामुळे होत असेल तर त्यामागे झोपेच्या वेळी लघवीचं प्रमाण वाढणे. हे सामान्यत: अँटीड्युरेटिक संप्रेरकांमुळे होतं. परंतु जसजसं आपलं वय वाढतं तसं रात्रीच्या वेळी हे संप्रेरक तयार होणं कमी होतं. ते मुख्य कारणांपैकी एक आहे.
 
मधुमेह किंवा हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, संध्याकाळी द्रवपदार्थांचं अतिसेवन, कॅफिन, अल्कोहोल किंवा तंबाखूमुळे यास चालना मिळते.
 
याव्यतिरिक्त काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे लघवीचे प्रमाण वाढू शकते किंवा मूत्राशयाचा त्रास होऊ शकतो. त्यात खालील औषधांचा समावेश आहे.
 
लघवीचे प्रमाण वाढवणारे पदार्थ
डाययुरेटिक्स: शरीरातील द्रव पातळीचा समतोल राखण्यासाठी आणि रक्तदाब कमी करण्यासाठी वापरली जाणारी औषधे.
 
अँटिकोलिनर्जिक्स: हे सामान्यतः मूत्राशय अतिक्रियाशील असेल तर वापरले जाते. त्यामुळे नर्व्ह सिग्नलमध्ये व्यत्यय येऊन लघवीची वारंवारता वाढू शकते.
 
रक्तदाबासाठी दिली जाणारी औषधं जसं की, कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स आणि अँजिओटेन्सिन -कन्व्हर्टिंग एन्झाइम इनहिबिटर.
 
काही अँटी डिप्रेसन्ट औषधं, जसं की, सेरोटोनिन रिअपटेक इनहिबिटर
 
बायपोलार डिसऑर्डरवर दिलं जाणारं लिथियम हे औषध
 
पण ही औषधं घेणाऱ्या प्रत्येकालाच नॉक्टुरियासारखे अनुभव येतात असं नाही.
 
ज्याला या लक्षणाची शंका आहे किंवा त्याबद्दल चिंता आहे त्यांनी डॉक्टरांशी बोलायला हवं, जेणेकरून ते यावर इतर औषध लिहून देऊ शकतात किंवा उपचारात बदल करू शकतात.
 
घरगुती उपचार
नॉक्टुरियावर प्रभाव टाकणारे अनेक घटक असतात, यावर वैयक्तिक उपचार करता येऊ शकतात. त्यावर काही प्राथमिक उपचार करता येऊ शकतात.
 
रात्री झोपण्याच्या चार ते सहा तास आधी द्रव पदार्थ शरीरात घेण्याचं प्रमाण कमी असावं. रात्रीच्या वेळी अल्कोहोल आणि कॅफिनसारखे पदार्थ टाळावे.
 
वजन जास्त असेल तर धूम्रपान करू नये आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करावा.
 
रात्री झोपण्यापूर्वी लघवी करून पेल्विक फ्लोअर ट्रीटमेंट करावी. रात्रीच्या वेळी पाय उंचावर ठेऊन झोपण्याचाही सल्ला दिला जातो.
 
मधुमेह किंवा हृदयविकार यांसारख्या वैद्यकीय स्थितीमुळे नॉक्टुरिया उद्भवल्यास योग्य उपचाराने ते दूर केले जाऊ शकते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार चालू ठेवणे आवश्यक आहे.
 
लघवीचे प्रमाण वाढवणाऱ्या औषधांचं वेळापत्रक बदला. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, जेणेकरून ते उपचारांमध्ये बदल करून त्याचे दुष्परिणाम कमी करू शकतील.
फिजिकल थेरपिस्टकडून पेल्विक फ्लोअर ट्रीटमेंटचे प्रशिक्षण घेतल्यास लघवीवर नियंत्रण राखण्यात मदत होऊ शकते.
 
ज्या लोकांना नॉक्टुरिया आहे त्यांच्यासाठी डॉक्टर अँटीड्युरेटिक हार्मोन आणि ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्स यांसारखी औषधे लिहून देतात.
 
लघवीचे प्रमाण वाढवणारी औषध दुपारी घ्यावीत.
 
वृद्ध लोकांमध्ये नॉक्टुरिया खूप सामान्य आहे. त्याचा झोपेवर परिणाम होतो. परिणामी त्यांच्या आरामावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होतो.
 
ही समस्या असलेल्या प्रत्येकाने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुमची जीवनशैली, सवयी आणि इतर शारीरिक समस्यांबद्दल संपूर्ण माहिती देऊन डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा.
 







Published By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mahatma Gandhi Essay महात्मा गांधी यांच्यावर निबंध