Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उचकी थांबवायची आहे तर करा हे उपाय…

उचकी थांबवायची आहे तर करा हे उपाय…
, शनिवार, 16 जून 2018 (06:36 IST)
उचकी लागली की कोणीतरी आठवण केली असेल असे आपण म्हणतो. तमात्र, डॉक्‍टरांच्या म्हणण्यानुसार उचकी येण्याचे शास्त्रीय कारण काहीतरी वेगळे आहे.

आपल्या शरीरात छाती आणि पोट यांच्यामध्ये श्‍वासपटल असते. नैसर्गिक श्‍वसनक्रियेत महत्त्वाची भूमिका वठवणारा, स्नायूंनी बनलेला हा एक मांसल पडदा असतो. या श्‍वासपटलाचे स्नायू अचानक काही कारणांमुळे अकस्मात आकुंचित पावतात. हे आकुंचन आपल्या मर्जीने नव्हे, तर ती एक अनैच्छिक अशी प्रतिक्षिप्त क्रिया असते. हे स्नायू आकुंचन पावताच घशातल्या स्वरयंत्राच्या तारासुद्धा क्षणभर जवळ येतात आणि हिक असा आवाज येतो. या क्रियेला उचकी लागणे म्हणतात.
उचकी का लागते…

खोलीचे तापमान बदलल्यास, गरम खाल्ल्यानंतर शीतपेय पिल्यास आणि धूम्रपान केल्याने उचकी येते. काही लोकांना चिंतेत असल्याल किंवा खूश असल्यावरही उचकी लागते.
उचकी थांबवायला काय करावे ?

उचकी लागल्यावर कानाच्या खालचा भाग दाबल्याने उचकी थांबते अशी जुनी समजूत आहे.
 
उचकी लागल्यास जीभेखाली मध ठेवा.
 
बर्फ किंवा तत्सम थंड पदार्थ गळ्यावर ठेवल्याने उचकी थांबते.
 
मद्यपान केल्यानंतर उचकी आल्यास लिंबाचा छोटा तुकडा जीभेखाली ठेवल्यास उचकी लगेच बंद होईल.
 
आणखी एक उपाय म्हणजे पेपर बॅग किंवा कापड तोंडाशी घेऊन श्वास घ्या आणि सोडा. यामुळे रक्तातील कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण वाढून तुमची उचकी थांबेल.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्यायाम केल्यानेवजन घटते, हा गैरसमज