Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

In rainy season पावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळायला पाहिजे...

rainy food
पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अनारोग्य निर्माण करणारे, उघड्यावरचे पदार्थ खालल्याने जंतूसंसर्ग, ताप यासारख्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे या दिवसात काही पदार्थ टाळले पाहिजे. 
 
* या दिवसात सॅलेड खाणं टाळावं. 
* पावसाळ्यात वातावरणात ओलावा असल्याने हिरव्या पालेभाज्यांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होते. त्यामुळे पालेभाज्या टाळल्या पाहिजेत. 
* कापल्यानंतर फळं लगेच खावीत. हवेशी संपर्क झाल्याने फळांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होते. 
* पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते. त्यामुळे तेलकट, तळकट पदार्थ खाऊ नयेत. 
* पावसाळ्यात भात खाल्ल्याने अंगावर सूज येण्यासोबतच पोट फुगतं. त्यामुळे भात प्रमाणात खावा. 
* मीठामळे पोट फुगतं आणि भूक जास्त लागते. त्यामुळे या दिवसात मीठही कमीच खावं. 
* पचनास जड असणार्‍या फ्लॉवर, कोबीसारख्या भाज्या खाऊ नयेत. 
* दह्यामुळे कफ होतो. 
* शीतपेयांमध्ये शरीरातल्या खनिजांचं प्रमाण कमी होऊन पचनक्रियेवर परिणाम होतो. 
  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Benefits of Eating Dal Rice: डाळ भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे