Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वजन कमी करण्यासाठी आहारात ह्या भाज्या समाविष्ट करा

वजन कमी करण्यासाठी आहारात ह्या भाज्या समाविष्ट करा
, गुरूवार, 28 जानेवारी 2021 (20:08 IST)
बऱ्याच वेळा व्यायाम न केल्यानं जिम न जाता देखील लठ्ठपणा कमी करता येतो. परंतु त्यासाठी  आपल्याला स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं  काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आहारात देखील लक्ष द्या की कोणती भाजी खाऊन लठ्ठपणा कमी करता येईल. बऱ्याच भाज्या फॅट-फ्री असून देखील फायबराने समृद्ध असतात.ज्या मुळे त्या वजन कमी करण्यात मदत करतात. चला तर मग जाणून घेऊ या की अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या वजन कमी करण्यात फायदेशीर आहे.
 
1 मुळा -
मुळात कॅलरी कमी प्रमाणात असते परंतु ह्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळत. ज्या भाज्यांत फायबर आढळते त्यांचे वैशिष्ट्य असे आहे की ह्यांना खाऊन लवकर भूक लागत नाही. फायबर हे क्रेविंग किंवा तृष्णा रोखते. म्हणून जर वजन कमी करायचे आहे तर या साठी आपल्या आहारात मुळा सॅलड किंवा भाजीच्या रूपात आवर्जून घ्यावा. 
 
2 बीट-
बीटमध्ये साखर मुबलक प्रमाणात परंतु कॅलरी कमी प्रमाणात आढळते. संशोधनांनुसार हे फॅटफ्री असत. तसंच हे फायबरने समृद्ध आहे.ह्याच्या सेवनाने बऱ्याच काळ भूक लागत नाही. बीट आरोग्यदायी होण्यासह व्हिटॅमिनने समृद्ध आहे. या मध्ये अनेक खनिजे असतात जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
 
3 गाजर -
गाजरामध्ये कमी कॅलरी असते तसेच ह्यात पोषक घटक आढळतात. गाजर हे वजन कमी करण्यात फायदेशीर आहे. जर आपण आपल्या वजनाला नैसर्गिक रित्या कमी करू इच्छिता तर या साठी दररोज गाजर खावं. गाजर हे फायबरने समृद्ध आहे जे आपल्या पोटाला बऱ्याच काळ भरलेले ठेवण्यात मदत करते. 
 
4 पालक- 
पोटाचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी पालक हे सर्वात उत्तम उपचार मानला आहे. कारण हे खूप पौष्टिक आहे.या दिवसात तर पालक सहजपणे उपलब्ध आहेत. फायबर शिवाय या मध्ये व्हिटॅमिन ए,सी,के,मॅग्नेशियम, आयरन आणि मॅगनीज आढळतं. पोटाचा लठ्ठपणा दूर करण्यासाठी पालकाचे सेवन दररोज करावं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनेक आजारांना दूर करण्यात फायदेशीर वीरासन