Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चेहऱ्यावर बर्फ लावतांना या गोष्टी ठेवाव्या लक्षात, तर मिळतील फायदे

Ice
, शनिवार, 1 जून 2024 (06:36 IST)
चेहऱ्यावर बर्फ लावल्यास अनेक फायदे मिळतात. पण बर्फ लावतांना काही गोष्टींचे लक्ष ठेवावे लागते. तर फायदे मिळतात. चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचा ताजी राहते. तसेच घाम, थकवा यांपासून आराम मिळतो. म्हणून बर्फ चेहऱ्याला लावण्यापूर्वी काही गोष्टींकडे विशेष लक्ष्य द्यावे. 
 
बर्फ चेहऱ्यावर घासू नये-
बर्फ सरळ चेहऱ्यावर कधीही घासू नये. ज्यामुळे ब्लड सेल्स थंडपणामुळे निळ्या पडू शकतात. बर्फ स्वच्छ रुमाल किंवा टिशू पेपर मध्ये घेऊन मग चेहऱ्यावर लावावा. 
 
बर्फमुळे होऊ शकते त्वचेला नुकसान-
अनेक वेळेस थंड बर्फ चेहऱ्यावर लावल्यास त्वचा थंडपणामुळे जळू देखील शकते. तसेच ब्लड सर्कुलेशन थांबू शकते. 
 
बर्फ चेहऱ्यावर किती वेलेलस लावावा-
चेहऱ्यावर बर्फ लावत असाल तर दिवसातून कमीतकमी एक वेळेसच लावावा. बर्फ लावल्याने त्वचा आतून स्वच्छ होते. तसेच ब्लॅक हेड्स स्वच्छ होतात. 
 
केव्हा लावावा बर्फ-
सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर बर्फ लावल्यास चेहऱ्यावर येणारी सूज कमी होते. ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन वाढते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तोतरेपणा: लहान मुलांमधला तोतरेपणा कसा ओळखायचा, त्याच्यावर काय उपचार असतात?