Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या तीन गोष्टींचे सेवन डोळ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, जाणून घ्या

eyes
, रविवार, 17 एप्रिल 2022 (16:47 IST)
डोळे ही देवाची देणगी मानली जाते, कारण ते शरीरातील सर्वात नाजूक भागांपैकी एक आहेत, म्हणून त्यांची विशेष काळजी घेणे देखील आवश्यक आहे. डोळ्यांना दुखापत, सूर्यप्रकाश आणि प्रदूषणापासून संरक्षण करण्याबरोबरच त्यांना आंतरिक शक्ती प्रदान करणे देखील आवश्यक आहे.
 
बाह्य संरक्षणासोबतच डोळ्यांच्या अंतर्गत आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक मानले जाते. यामध्ये आपल्या आहाराची विशेष भूमिका आहे. आपण दररोज जाणूनबुजून किंवा नकळत अशा अनेक पदार्थांचे सेवन करत असतो जे डोळ्यांसाठी खूप हानिकारक असतात. अनेक गोष्टींचे दीर्घकाळ सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी ही कमी होऊ शकते.
 
शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच डोळ्यांनाही योग्य पोषण आवश्यक आहे. डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए, ई, सी सोबत ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. जाणून घेऊया कोणत्या गोष्टी डोळ्यांसाठी हानिकारक मानल्या जातात. या गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
 
1 जंक फूड्स - हे डोळ्यांसाठी हानिकारकअसतात जंक फूडमुळे केवळ शरीराचे वजन वाढत नाही, तर त्याचे अतिसेवन डोळ्यांसाठीही हानिकारक मानले जाते. चिप्स, कुकीज आणि कँडी यांसारख्या स्नॅक पदार्थांचे अतिसेवन शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचवतात. या गोष्टींमधील अस्वास्थ्यकर चरबी व्यतिरिक्त, मीठ आणि साखरेचे प्रमाण शरीरातील अवयव आणि रक्ताभिसरण प्रणालीवर परिणाम करते, ज्यामुळे डोळ्यांना रक्त आणि ऑक्सिजनच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. जंक फूड घेणे टाळावे.
 
2 कोल्ड ड्रिंक -सोडा -सोडा आणि कोल्ड्रिंक्स ही लोकांची उन्हाळ्यात पहिली पसंती असते, ते शरीराला तजेलदार बनवतात आणि आपल्याला  ताजेतवाने वाटते. पण हे माहित आहे का की हे सेवन करणे शरीरासाठी खूप हानिकारक मानले जाते. संशोधनात असे आढळून आले आहे की कोल्ड ड्रिंक्समध्ये मोठ्या प्रमाणात फ्रक्टोज असते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढते. संशोधकांना असे आढळून आले की अशा प्रकारचे गोड पदार्थ वापरणारे पेय ट्रायग्लिसराइडचे प्रमाण वाढवतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. या स्थितीमुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो.
 
3 तळलेले पदार्थ-तळलेले पदार्थ जसे पकोडे, समोसे इत्यादी आवडत असतील तर त्यांचा वापर कमी करा. हे खाणे डोळ्यांसाठी हानिकारक असू शकतात. तळलेल्या पदार्थांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. परिणामी डोळ्यांना इजा होण्याचा धोकाही वाढतो. डोळे निरोगी ठेवण्यासाठी चरबीयुक्त पदार्थांचे जास्त सेवन टाळा. 
 
डोळे निरोगी ठेवण्यासाठी काय खावे?
दृष्टी टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी आहारात अधिकाधिक आरोग्यदायी आणि पौष्टिक गोष्टींचा समावेश करा. अंडी, हिरव्या पालेभाज्या, लिंबूवर्गीय फळे आणि बेरी, ओमेगा -3 फॅटी ऍसिड असलेले पदार्थ, मासे, बदाम इत्यादींचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. दररोजच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

UGC Double Degree: एकाच वेळी दोन पदव्या घ्यायच्या असतील तर काय करावे, जाणून घ्या