Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Best Time to Drink Coffee कॉफी पिण्यासाठी ही वेळ आरोग्यासाठी हानिकारक, योग्य वेळ आणि प्रमाण जाणून घ्या

coffee cup
गुरूवार, 14 जुलै 2022 (13:30 IST)
चहा- कॉफीची सवय व्यसनांपेक्षा कमी नाही. बरेच लोक सकाळी कॉफी पितात. कॉफी आपला थकवा दूर करण्यासाठी आणि आपला मूड सुधारण्यासाठी चांगला पेय असल्याचे बघितलं जातं. कॉफीमध्ये कॅफिन असतं जे मध्यवर्ती मज्जासंस्था, हृदय आणि स्नायूंना उत्तेजित करतं. असे मानले जाते की यामुळे दक्षता वाढते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, झोपेच्या कमतरतेमुळे थकवा दूर करून 1 कप कॉफी आपल्याला सतर्क करू शकते. परंतु इतर सर्व गोष्टींप्रमाणेच कॉफी पिण्याचीही एक मर्यादा आहे, जर तुम्ही जास्त प्रमाणात याचं सेवन करत असाल तर नुकसान होऊ शकतं. येथे काही अटी आहेत, ज्यामध्ये आपण विशेषत: कोणत्या वेळी आणि किती कॉफी प्याली पाहिजे याची काळजी घ्यावी.
 
सकाळी उठल्यानंतर कॉफी पिणे नुकसान करु शकतं 
बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर कॉफी पिण्यास सुरवात करतात, परंतु असा विश्वास आहे की कॉफी उठल्यानंतर तीन तासांनी प्यावी. यामागचे कारण असे आहे की सकाळी स्ट्रेस हॉरमोन कॉर्टिसॉलचं प्रमाण जास्त असतं. हा हॉरमोन आपली अलर्टनेस आणि फोकस वाढवण्यास मदत करतं. आणि रक्तदाब आणि चयापचय प्रतिरक्षा प्रतिसादापासून प्रत्येक गोष्ट नियंत्रित करतं. सकाळी उठल्याबरोबर कॉफी प्यायल्यास कॉर्टिसॉलची पातळी गडबडून जाते. जे तुमच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतं. दिवस जसजसा वाढत जातो तसतसे कोर्टिसॉलची पातळी हळूहळू कमी होते, नंतर आपण कॉफी पिऊ शकता. तथापि, या गोष्टीला पाठिंबा देण्यासाठी अभ्यासाची आवश्यकता आहे. तरीही, सुरक्षिततेसाठी, आपण थोड्या वेळा थांबून कॉफी प्याल्यास आरोग्यासाठी योग्य ठरेल.
 
कॉफीचे व्यसन होऊ शकतं
कॅफिनचे अनेक फायदे असतात परंतु काही रिपोर्ट्सप्रमाणे कॅफिनची व्यसनाप्रमाणे सवय पडते. कॅफिन कोकेनसारखे कार्य करणारी मेंदूची काही रसायने सोडतात असे मानले जाते. कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य ड्रग्ससारखे व्यसन देत नसले तरी जास्त कॉफी प्यायल्याने आपण मानसिक किंवा शारिरीक त्यावर अवलंबून राहू शकता. उदाहरणार्थ, कॉफीशिवाय तुम्हाला सुस्त किंवा डोकेदुखी वाटू शकते.
 
या लोकांनी कॉफी पिऊ नये
काही अहवालानुसार, रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने पोटातील लाइनिंगला नुकसान होतं. म्हणून काहीतरी खाल्ल्यानंतरच कॉफी प्या. अगदी सामान्य लोकांसाठी, एका दिवसात 4 कपपेक्षा जास्त कॉफी हानी पोहोचवू शकते. दुसरीकडे, आपल्याला एंग्जाइटी डिसऑर्डर, बाईपोलर डिसऑर्डर, हार्ट प्रॉब्लम किंवा अतिसार सारख्या समस्या असल्यास कॉफी टाळा. त्याच वेळी, गरोदरपणात 2 किंवा तीन कपपेक्षा जास्त कॉफी पिऊ नका.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rajasthani Mirchi Vada राजस्थानी मिर्ची वडा घरीच तयार करा