Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काळ्या मिठाचे 5 चमत्कारी फायदे जाणून घ्या

काळ्या मिठाचे 5 चमत्कारी फायदे जाणून घ्या
, रविवार, 30 मे 2021 (09:00 IST)
काळ मीठ हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.हे केवळ अन्नाची चवच वाढवत नाही तर औषध म्हणूनही कार्य करते. त्यात असणारे खनिज हाडे मजबूत करतात. याच्या सेवनाने पोटाशी संबंधित आजारांमध्येही आराम मिळतो. चला आज आम्ही  काळ्या मिठाचे सेवन करण्याचे फायदे सांगत आहोत जाणून घ्या.
 
1 बद्धकोष्ठते आणि पोटफुगीपासून आराम देतं-जर आपल्याला अपचन,गॅस,ऍसिडिटी,बद्धकोष्ठतेचा त्रास आहे.तर आपण काळ मीठ आवर्जून खावे.यामुळे त्वरीतआराम मिळेल.मळमळ होत असल्यास काळ मीठ खावं लवकर आराम मिळतो.एका संशोधनानुसार वेगवेगळ्या आयुर्वेदिक चूर्ण मध्ये देखील काळ मीठ वापरतात.काळ्या मिठात असलेले लक्सेटीव्ह गुणधर्म पोटाच्या समस्ये मध्ये आराम देतं.
 
2 वजन कमी करण्यात -साधारण मिठात सोडियम जास्त प्रमाणात असतो.जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.याचा जास्त वापर केल्याने हाड गळण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो.म्हणून आपल्या आहारात काळ मीठ वापरावे.नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीच्या माहितीनुसार,खाण्यात जास्त सोडियम घेतल्याने लठ्ठपणा अधिकच वेगाने वाढतो. म्हणून आहारात काळे मीठ वापरावे.काळ्या मीठात सोडियमचे प्रमाण कमी असते.
 
3 स्नायूमध्ये आराम मिळतो-इलेक्ट्रोलाइट्सच्या अभावामुळे स्नायूमध्ये वेदना होते.इलेक्ट्रोलाइट्स मध्ये मॅग्नेशियम,कॅल्शियम आणि पोटॅशियम असतात. याची मात्रा काळ्या मीठात आढळते. वेदना आणि अंगाची समस्या काही प्रमाणात काळ मिठाच्या  वापराने कमी केली जाऊ शकते.
 
4 कफाचा त्रास-कफाचा त्रास होत असल्यास काळ्या मिठाचा खडा तोंडात ठेऊन त्याचा रस चघळत राहा.असं केल्यावर 2 तास काहीच खाऊ पिऊ नका.कफाच्या त्रासात आराम मिळेल.
 
5 मुलांना काळ मीठ द्या- काळ मीठ आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे.कारण या मध्ये सोडियमचे प्रमाण कमी आहे. मुलं हे सहज खाऊ शकतात.एका संशोधनानुसार,मुलांना जास्त मीठ खायला देऊ नये.परंतु काळ मीठ आपण देऊ शकतो.हे फायदेशीर आहे. हृदयाचा कोणताही आजार होऊ नये म्हणून साध्या मिठा ऐवजी काळ मीठ देणं फायदेशीर आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रेमभंग किंवा ब्रेकअप झाले असल्यास हे करा