Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पावसाळी तापाचे कारण, लक्षण आणि महत्वाची खबरदारी जाणून घ्या

पावसाळी तापाचे कारण, लक्षण आणि महत्वाची खबरदारी जाणून घ्या
, बुधवार, 23 जून 2021 (22:26 IST)
पावसाळा हा आल्हाददायक आणि आनंददायी हंगाम आहे.तरी या हंगामात संसर्ग झपाट्याने वाढतो.या हंगामात सर्दी-पडसं,खोकला सर्वात जास्त पसरतो.या पावसाळी तापापासून कसा टाळता येईल जाणून घेऊ या.
पावसाळी आजारापासून वाचण्यासाठी सर्वप्रथम हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे की हा आजार कोणत्या कारणामुळे होतो.
 

1 ठिकठिकाणी पाणी साचून त्यात डास वाढणे,जे डेंग्यू आणि मलेरिया पसरवतात.
 

2 विषारी कीटक,जंत,माश्या,डासांमुळे अन्नआणि पाणी संसर्गजन्य होणे.
 

3  वायू प्रदूषणाने संक्रमणाचा प्रसार.
 
 
4 पित्त प्रदूषित होणे,कारण पित्तामुळे होणाऱ्या आजारांमध्ये ताप प्रमुख आहे.
 

5 उन्हात चालणे आणि पावसात भिजणे.
 

आता या तापाची लक्षणे जाणून घेऊ या 
 

1 डोक्यात आणि शरीरात वेदना होणे.
 

2 लघवीचा रंग लाल होणे.
 

3 अस्वस्थता जाणवणे.
 

4 तहान जास्त प्रमाणात लागणे.
 

5 तोंडाची चव कडू होणे,मळमळणे,
 

6  संधिवातामुळे स्नायूंमध्ये वेदना होणे.
 
 

ताप असल्यास या खबरदारी घ्या - 
 
 

1 ताप असल्यास रुग्णाला मोकळ्या हवादार खोलीत झोपवावे.शक्य तितका  आराम करू द्या.
 

2 ताप असल्यास सकस आणि हलकं जेवण घ्या.
 

3 श्रम करू देऊ नका.
 

4 दूध,चहा,मोसंबीचा रस घेऊ शकता.तेलकट आणि गरिष्ठ मसालेयुक्त अन्न घेणं टाळा.
 

5 हे सर्व लक्षणे आढळल्यास त्वरितच डॉक्टरांना दाखवावे किंवा घरगुती आयुर्वेदिक उपचार करा.
 

6 पाणी उकळवून आणि कोमट करूनच प्या.
 

7 हंगामात बदल होण्याच्या वेळी योग्य आहार घेणे.
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निपाह व्हायरस संसर्गाची लक्षणं काय? हा व्हायरस कसा पसरतो?