साप हे जमीन, समुद्र , वाळवंट आणि जंगलात आढळणारे सरपटणारा प्राणी आहे. साप विषारी प्राणी मानला जातो सापाला सर्व घाबरतात. परंतु सत्य हे आहे की साप माणसांना घाबरतात .त्यांना चिडवल्याशिवाय ते विनाकारण चावत नाही.
साप शिकार पकडण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी चावतात, विषारी साप चावल्यावर विष सोडतात. प्रत्येक वेळा साप विष सोडतो असे आवश्यक नाही.
साप चावल्यावर काय उपाय करावे. जेणे करून पीडित व्यक्तीचा जीव वाचवू शकाल. चला तर मग जाणून घ्या .
* सर्पदंश झाल्यावर पीडित व्यक्तीला ताबडतोब रुग्णालयात किंवा डॉक्टरकडे नेले पाहिजे.
* सापाकडे नीट लक्ष द्या. जेणे करून आपल्याला डॉक्टरांना सापाबद्दल माहिती देता येईल.
* पीडित व्यक्तीला सापापासून दूर करा.
* पीडित व्यक्तीला शांत निजवून ठेवा. त्याला हालचाल करू देऊ नका. हालचाल केल्याने विष पसरणार नाही.
* जखमेला पट्टीने सैलसर बांधा.
* जखमेच्या ठिकाणी दागिने असल्यास ते काढून घ्या.
* पायाला किंवा पंजाला साप चावला असल्यास पायातील बूट काढून घ्या.
* जखम पाण्याने आणि साबणाने धुवा.
* पिंपळाचे ताजे देठ कानात लावून घट्ट धरून ठेवावे. असं केल्याने सापाचे विष उतरते.
* साप चावलेल्या व्यक्तीचे डोकं 2 -3 माणसांनी घट्ट धरून ठेवावे .कारण या काळात पीडित व्यक्तीला खूप त्रास होतो.