कोरोनाच्या साथीच्या आजारात देशातील बहुतेक लोक घरातून काम करत आहे. घरातच राहायचे,घरी जेवण,घरातच फिरणे,ऑफिस झाल्यावर देखील घरातच राहणे.अशा परिस्थितीत स्वतःकडे लक्ष देणं देखील महत्त्वाचे आहे.पूर्वी ऑफिसातून येऊन घरात आराम मिळायचा परंतु आता असं नाही.म्हणून ऑफिसच्या वेळेत आपल्या खाण्या-पिण्याकडे लक्ष कसे ठेवायचे जाणून घ्या.
1 न्याहारी सोडू नका-काम कितीही महत्वाचे असले तरीही ऑफिसपूर्वी आपण नाश्ता केलाच पाहिजे. कारण ऑफिसच्या वेळी खूपच कमी वेळ मिळू शकतो किंवा कधीकधी वेळही मिळत नाही. तर आपल्या नित्यक्रमात बदल करून न्याहारी करा. डॉक्टरांनी सकाळी न्याहारी करण्याचा सल्ला दिला आहे. न्याहारीमध्ये जास्त तेलकट,तूपकट नसावे. साधारणपणे न्याहारीत आपण दलिया, ज्यूस, उपमा,पोहे घेऊ शकता. कारण तुम्हाला दिवसभर काम करायचे आहे.
2 दूध पिणे सोडू नका-दूध शरीर मजबूत करण्याचा सर्वात महत्वाचा भाग आहे. शरीरासाठी कॅल्शियम खूप महत्वाचे आहे. दुध केल्शियमने समृद्ध असत दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे महिलांना सांध्यातील वेदना वेळेआधीच सुरू होते. म्हणूनच एक ग्लास दूध प्या.
3 पाणी पिणे सुरू ठेवा - कामाच्या वेळी पाणी पिण्यास विसरू नका. शरीराला हायड्रेटेड ठेवा. यामुळे शरीरात संक्रमणाचा धोका कमी होईल. तसेच ताप आल्यावर देखील जास्त पाणी प्यावे. जेव्हा पाणी संपेल तेव्हा बाटली पुन्हा भरा. पाणी पिल्यानंतर अनेकदा एक बाटली प्यायल्यावर पुन्हा पाणी पिणे विसरतो. शरीरात पाण्या अभावी अनेक रोग उद्भवतात.म्हणून पाणी पीत राहावे.
4 जेवण करा-कामामुळे जेवणाची वेळ देखील बदलते.म्हणून वेळीच हलकं जेवण करा.कारण जेवल्यावर पुन्हा कामावर बसायचे आहे.जेवल्यावर 15 मिनिट वॉक साठी काढाल तर जास्त चांगले आहे.
5 व्यायाम करायला विसरू नका-कामादरम्यान काही होत आहे हे कळतच नाही.नंतर लक्षात येतं.म्हणून मान,डोळे,पाय आणि हाताचे लहान लहान व्यायाम करा.यामुळे आपल्या शरीरावर कोणते ही परिणाम होणार नाही.
6 स्नॅक्स- आपल्याला कामाच्या दरम्यान भूक लागली असेल तर केवळ आरोग्यदायी स्नॅक्स खा किंवा फळ खा. यामुळे अतिरिक्त चरबी वाढणार नाही आणि बसल्याने अपचनाची कोणतीही समस्या होणार नाही.
म्हणून काम करताना आपल्या आहाराची काळजी घ्या. जेणेकरून या साथीच्या आजारात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये.