Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mobile phone side effect : जास्त फोन वापरल्याचे नुकसान

mobile
, सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (17:31 IST)
Mobile phone side effect:आजच्या काळात स्मार्टफोन ही एक अशी गोष्ट आहे. ज्याच्याशिवाय आपण एकाक्षणी देखील राहू शकत नाही.लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत जो पहा तो स्मार्टफोनला चिटकून बसलेला आहे. स्मार्टफोन आपल्या इतका गरजंचा झाला आहे की, लोकांना उठता, बसता, कुठे ही गेलं तरी तो त्यांना जवळ लागतोच. लोकांकडे फोन नसेल, तर काही चुकल्यासारखे वाटते. प्रत्येक लहान-मोठ्या गरजांसाठी फोन अतिशय उपयुक्त आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये असे काही फिचर्स आहेत. जे आपल्याला फार मदत करतात. या स्मार्टफोन मुळे आपण दूरवर असलेल्या आपल्या आप्तेष्टयांशी सहजच बोलू शकतो त्यांना बघू शकतो. स्मार्टफोनमुळे आता आपण कोणतेही बिल घरीबसल्या सहजपणे भरू शकतो.   ज्यामुळे लोक सगळ्याच गोष्टींसाठी फोनवर अवलंबून राहातात.
 
परंतु तुम्हाला माहितीय का, जास्त फोनचा वापर केल्यामुळे तुमच्या आरोग्याचे फार मोठे नुकसान होऊ शकते. स्मार्टफोनचा जास्त वापर केल्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
 
बऱ्याच लोकांना हे समजतं की , फोनचा अति वापर करण्याची त्यांची ही सवय चांगली नाही आणि त्यांना ती सोडायची असते, परंतु कितीही प्रयत्न केला तरी मात्र लोकांना या सवयी सोडता येत नाही. स्मार्टफोनचा अति वापर केल्याने  अशा काही समस्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही लगेच फोन वापरणं सोडण्याचा प्रयत्न कराल.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 डोळ्यांना नुकसान होणं -
मोबाईलचा सतत वापर केल्याने डोळ्यांवर ताण येतो. काहीवेळा आपल्याला ते कळत नाही, परंतु यामुळे आपल्या डोळ्यांना नुकसान होऊ शकते. आपले डोळे शरीराच्या सर्वात संवेदनशील भागांपैकी एक आहेत. मोबाईलच्या निळ्या स्क्रीनमुळे तुमच्या डोळ्यांना खूप नुकसान होऊ शकते.
 
यामुळे गंभीररित्या डोकेदुखी, डोळा दुखणे आणि डोळे कोरडे होऊ शकतात. अशा परिस्थितीत, सेल फोन वापरताना अधून मधून ब्रेक घेणे खूप महत्वाचे आहे.
 
2 मनगटात वेदना होणं -
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वापर हे वाईटच. त्यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तु म्हटली तर ती वापरताना आपण सावधगिरी बाळगणे चांगले. फोनच्या अतिवापरामुळे मनगटात सुन्नपणा आणि वेदना होऊ शकतात. यामुळे तुम्हाला हातावरती ताण येईल आणि दुसरं काम करताना तुम्हाला त्रास उद्भवू शकतो.
 
3 मुरूम होणं -
फोनच्या हानिकारक किरणांमुळे तुम्हाला मुरुमांचा त्रास उद्भवू शकतो. अनेक संशोधनांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, मोबाईलमध्ये जंतू आणि बॅक्टेरिया असतात जे तुमच्या त्वचेवर येऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या त्वचेवर डाग येऊ शकतात. तसेच ते अकाली वृद्धत्वाचे कारण बनू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा मोबाईल दररोज पुसून स्वच्छ करून वापरावे.
 
4 निद्रानाश -
झोप हा आपल्या जीवनशैलीचा सर्वात आवश्यक भाग आहे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी चांगली झोप आवश्यक आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने झोपेची वेळ कमी होते. यामुळे तुम्हाला सकाळी फ्रेश वाटत नाही तसेच दिवसा झोपही येते. मोबाईलच्या अतिवापरामुळेही कधी कधी निद्रानाश होतो. ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यासह तुमच्या कामावर देखील होतो.
 
5 तणाव वाढणे -
प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तणाव येतच असतो. परंतु बऱ्याचदा अनेक गोष्टी फोनमध्ये वाचल्याणे, ऐकल्याने, जास्त  ताण तणाव येतो. ज्याचे नंतर गंभीर आजारात रुपांतर होऊ शकते.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Independent Day 2022 Essay स्वातंत्र्य दिन 2022 वर निबंध