पावसाळा जो साऱ्या पृथ्वीच्या सौंदर्याला फुलवून टाकतो, तिथे बऱ्याच आजारांना निमंत्रण देखील देतो. म्हणूनच या पावसाळ्याचा आनंद घेतांना आपल्या आरोग्याची काळजी देखील घ्या. चला तर मग जाणून घ्या की पावसाळ्यात कोण कोणते आजार होण्याची शक्यता असते.
व्हायरल ताप
विषाणूजन्य ताप पावसाळ्याच्या दिवसात जास्त होतो. म्हणून या काळात आपल्याला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. यामध्ये सर्दी, पडसं, ताप, शरीरामध्ये कडकपणा सारखे लक्षण दिसून येतात. यासाठी आपण हर्बल चहा घ्यावा. रात्री झोपण्याआधी हळदीचे दूध प्या आणि दिवसभर कोमट पाणी प्यावे.
टायफॉईड
टाइफॉइडचा आजार प्रदूषित पाणी आणि प्रदूषित अन्नामुळे होतो म्हणून पावसाळ्यामध्ये खाण्यापिण्यांवर विशेष लक्ष देणे गरजेचे असते. अश्या वेळी जेवढे शक्य असेल, बाहेरच्या खाण्यासाठीचे अंतर राखणे आवश्यक आहे. त्याच बरोबर स्वच्छतेकडेही लक्ष दिले पाहिजे.
पोटाचे त्रास
पावसाळ्यात होणाऱ्या आजारांमध्ये एक अजून आजार म्हणजे पोटात संसर्ग होणे. यामुळे उलट्या, जुलाब, आणि पोटात दुखणे हे लक्षणे उद्भवतात. जास्त करून हे अन्न आणि तरल पदार्थ खाल्ल्यामुळे होतो. या दरम्यान उकळलेले पाणी पिणे, घरी बनवलेले जेवण खाणे ईत्यादि केल्याने आपण संसर्गापासून वाचू शकतो.
या गोष्टींची काळजी घ्या..
1 घराच्या भोवती पाणी साचू देउ नये, खड्डे मातीने पुरून द्यावे. अवरुद्ध नाल्याना स्वच्छ करावं.
2 पाणी साचणे थांबविणे शक्य नसल्यास त्यामध्ये पेट्रोल किंवा रॉकेल घालावे.
3 खोलीतील कुलर आणि फुलदाण्यातील सर्व पाणी आठवड्यातून एकदा आणि पक्षींना धान्य-पाणी देणाऱ्या भांड्याना दररोज पूर्णपणे रिकामं करावं, त्यांना वाळवावे आणि मगच भरावं. घरामध्ये तुटलेले डबे, टायर, भांडी आणि बाटल्या इत्यादी ठेवू नये. आणि जर ठेवायचे असेल तर ते पालथे करून ठेवावे.
4 कोमट पाणी पिण्याची सवय लावा. दिवसभर कोमट पाणीच प्यावे.
5 हर्बल चहा आणि हळदीच्या दुधाचे नियमित सेवन करावं.
6 खाण्यामध्ये आलं - लसणाचं समावेश करावा.