शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उलट ते बदामाचे पर्याय मानले जाते.बदाम असणारे सर्व पोषक घटक शेंगदाण्यात सहज उपलब्ध असतात.परंतु बदाम महाग आहे आणि शेंगदाणे स्वस्त आहे आपण बदाम ऐवजी सहज शेंगदाणे खाऊ शकता.एक लिटर दुधाऐवजी 100 ग्राम कच्च्या शेंगदाण्यात जास्त प्रोटीन असत. शेंगदाण्याबरोबरच शेंगदाणा तेलाचेही बरेच फायदे आहेत. हे जंतांचा नायनाट करण्यात मदतगार आहे.
चला तर मग जाणून घेऊ या शेंगदाण्याच्या फायद्यां बद्दल.
1 हाडांना बळकट करत -शेंगदाण्याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. शेंगदाण्यातील पोषक घटकांपासून शरीराला व्हिटॅमिन डी आणि केल्शियम मिळतं.बदामाच्या ऐवजी आपण सहज हे खाऊ शकता.
2 हार्मोन्सला समतोल करतो- जेव्हा स्त्रिया आणि पुरुषांमध्ये हार्मोन्स असंतुलित होतात, तेव्हा अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवतात. म्हणून पुरुष आणि स्त्रियांनी दररोज मूठभर शेंगदाणे खावे.
3 कर्करोगापासून संरक्षण-शेंगदाण्यामध्ये पॉलीफेनोलिक नावाचा अँटीऑक्सिडेंट आढळतो. त्याच्या सेवनाने पोटाच्या कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.आठवड्यातून एकदा तरी शेंगदाणे लोण्यासह खावे.
4 सुरकुत्या कमी करते-शेंगदाणे खाल्ल्याने सुरकुत्या कमी होतात.या मध्ये असलेले घटक बारीक रेषा आणि सुरकुत्या तयार होण्यापासून रोखते.
5 मधुमेहाला नियंत्रित करते-शेंगदाणे खाल्ल्याने मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.दररोज आपल्या आहारात याचे सेवन करावे.जेणे करून जीवघेण्या आजारापासून बचाव होऊ शकेल.