Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सकाळी ब्रश न करता आपल्याही खाण्या-पिण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा

सकाळी ब्रश न करता आपल्याही खाण्या-पिण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा
Side Effects Of Eating Food Without Brush शारीरिक आणि मानसिक आरोग्याप्रमाणेच तोंडाच्या आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते जर एखाद्या व्यक्तीचे तोंडाचे आरोग्य खराब असेल तर त्याला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे तोंडाच्या स्वच्छतेची नेहमी काळजी घेणे गरजेचे आहे. तोंड स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करावा, असा सल्लाही आरोग्य तज्ज्ञ देतात. यामुळे तोंडात असलेले बॅक्टेरिया आणि जंतू साफ होतात. हे हानिकारक बॅक्टेरिया साफ न केल्यास ते पोटात जातात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. काही लोक दात न घासता चहा पिण्यास सुरुवात करतात, परंतु ही सवय तुमच्यासाठी गंभीर समस्या निर्माण करू शकते. सकाळी दात न घासता खाण्याची सवय तुमच्या आरोग्याला कशी हानी पोहोचवते हे जाणून घ्या- 
 
हृदयरोगाचा धोका
आरोग्य तज्ज्ञांच्या मते दात न घासता खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. दातांवर साचलेले प्लाक, बॅक्टेरिया आणि घाण शरीरात शिरून हृदयाच्या नसा ब्लॉक करतात, त्यामुळे नसांमध्ये ब्लॉकेजची समस्या निर्माण होते. त्यामुळे हृदयातील रक्ताभिसरणही कमी होऊन हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
 
दुर्गंधी
जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला दुर्गंधी येते. तोंडात असलेले बॅक्टेरिया या दुर्गंधीसाठी कारणीभूत असतात, जरी रोज ब्रश केल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होते आणि श्वासही ताजेतवाने होतो, परंतु जर तुम्ही ब्रश न करता अन्न खाल्ले तर दिवसभर तोंडाला दुर्गंधी येत असते.
 
गर्भवती महिलांना नुकसान
गरोदर महिलांनी दात न घासता काही खाल्ले तर त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरच नाही तर बाळाच्या आरोग्यावरही होतो. यामुळे मुदतपूर्व प्रसूती बाळाचे कमी वजन आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.
 
हिरड्या खराब होऊ शकतात
ब्रश न केल्यास हिरड्या कमकुवत होतात. हानिकारक जीवाणूंमुळे त्यांना सूज येणे आणि रक्तस्त्राव यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. दात न घासता अन्न खाल्ल्याने समस्या आणखी वाढू शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Relationship : आदर्श पती-पत्नीच्या नात्यात हे पाच गुण असले पाहिजेत