असं म्हणतात की , पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेकारक असत. चेहऱ्यावर ग्लो येण्याची बाब असो किंवा निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ञ दोघांसाठी पाणी पिण्याचा सल्ला देतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की जास्त पाणी पिणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते.आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्याल तर तुम्हाला ओव्हरहायड्रेशनची समस्या उद्भवू लागते. या मुळे आरोग्याचे नुकसान होतात चला तर मग जाणून घ्या.
1 किडनीसाठी धोकादायक -
ओव्हरहायड्रेशनमुळे आपली किडनीही खराब होते. वास्तविक, जेव्हा आपण जास्त पाणी पितो तेव्हा त्यामुळे आर्जिनिन व्हॅसोप्रेसिनची प्लाझ्मा पातळी कमी होते. ज्याचा थेट परिणाम किडनीच्या कार्यक्षमतेवर होतो.ते किडनीसाठी धोकादायक आहे.
2 इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण कमी होते -
जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील मीठ आणि इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण कमी होते. त्याच वेळी, यामुळे पोट फुगणे तसेच उलट्या, डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवतात. याशिवाय प्रकृती बिघडल्यास व्यक्तीबेशुद्ध ही होऊ शकते.
3 पेशींमध्ये सूज येते-
जास्त पाणी प्यायल्यास पेशींमध्ये सूज येऊ शकते जी आरोग्यासाठी खूप धोकादायक असते. या स्थितीमुळे स्नायूंच्या ऊती आणि मेंदूचे नुकसान यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
4 मेंदूवर परिणाम-
ओव्हरहायड्रेशन मुळे सोडियमच्या कमी पातळीमुळे मेंदूच्या पेशींना सूज येते. आणि बोलणे कठीण होते आणि नीट चालता येत नाही.
5 यकृताला नुकसान होऊ शकते-
जास्त लोहयुक्त पाणी वापरता, तेव्हा ते ओव्हरहायड्रेशनच्या स्थितीसाठी देखील जबाबदार असते. ज्यामुळे यकृताशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
6 हृदयाला धोका-
जास्त पाणी प्यायल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर थेट दबाव पडतो. या अनावश्यक दबावामुळे हृदय बंद पडण्याचा धोका निर्माण होतो.