Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तेजना वाढवण्यासाठी आणि शारीरिक संबंधाविषयी इतर समस्यांपासून मुक्तीसाठी हे खा

उत्तेजना वाढवण्यासाठी आणि शारीरिक संबंधाविषयी इतर समस्यांपासून मुक्तीसाठी हे खा
, गुरूवार, 22 फेब्रुवारी 2024 (21:47 IST)
आजकाल लोकांची जीवनशैली इतकी वाईट होत चालली आहे की त्याचा लैंगिक जीवनावर आणि लैंगिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयी, जास्त वेळ जागे राहणे, मोबाईल, लॅपटॉपचा अतिवापर, तणावाखाली राहणे, ही काही कारणे आहेत ज्यामुळे पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे हळूहळू सेक्समधील रस कमी होऊ लागतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे अनेक वेळा पुरुषांमध्ये नपुंसकत्व, इरेक्टाइल डिसफंक्शन, शुक्राणूंची संख्या कमी होणे यासारख्या समस्या दिसून येतात. याचा वैवाहिक जीवनावरही वाईट परिणाम होतो. जर तुम्हालाही अशा समस्या येत असतील तर तुमच्या आहारात मखाना समाविष्ट करून पहा.
 
मखाना हेल्दी स्नॅक्स
हल्कं आणि सोपारीत्या पचणारा मखाना (Fox nut benefits) आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरु शकतो. मखाना सेवन केल्याने ताण कमी होण्यास मदत होते. झोप चांगली येते. रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात 6-7 मखाना घ्यावे.
 
मखाना खाऊन लैंगिक समस्यांपासून मुक्ती मिळवा
तुम्हाला सेक्सशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, काही दिवस तुमच्या आहारात मखाना (Makhana boost sexual health) समाविष्ट करून पहा. माखना (lotus seed) एक आयुर्वेदिक औषधी हर्ब आहे, जी तुटत असलेली नाती पुन्हा जोडू शकते. याचा अर्थ असा आहे की याच्या सेवनाने लैंगिक समस्या दूर होऊ शकतात. त्यात कार्बोहायड्रेट, प्रथिने, खनिजे, चरबी, फॉस्फरस इत्यादी पौष्टिक घटक असतात. हे सर्व घटक लैंगिक उत्तेजना, कामवासना आणि लैंगिक शक्ती (Sex power) वाढवतात. मखाना शुक्राणूंची गुणवत्ता (Sperm quality) सुधारते आणि त्यांची संख्या वाढवते.
 
मखाना खा, सेक्सची इच्छा वाढवा
मखानाच्या नियमित सेवनाने शरीरातील अशक्तपणा दूर होतो आणि आपले शरीर निरोगी राहते. मखानामध्ये असलेले प्रथिने, कार्बोहायड्रेट, चरबी, खनिजे आणि फॉस्फरस इत्यादी पौष्टिक घटक देखील लैंगिक इच्छा वाढवण्यास मदत करतात. त्याच्या सेवनाने शुक्राणूंची संख्या देखील सुधारते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तेनालीरामची कहाणी: प्रतिवासी राजा