काय आपल्याही उशीविना झोपण्याची सवय नाही... तर ही माहिती खास आपल्यासाठी आहे. खूप दिवस एकच उशी वापरणे धोकादायक ठरू शकतं. विश्वास होत नसेल तर जाणून घ्या कारण आणि उपाय:
1 आपण वापरत असलेल्या उशीत बॅक्टेरिया आढळतात. धूळ कण, पाळीव जनावर यांच्यामुळे पसरणारे हे जिवाणू आपल्यावर परिणाम टाकतात. यामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना सामोरा जावं लागू शकतं.
2 खूप दिवसांपासून एकच उशी वापरल्याने त्यात पहिल्यासारखं आराम मिळत नाही. अनेकदा आपल्याला नीट झोप का होत नाही यामागील कारण कळत नाही.
3 अधिक वापरलेली उशी सपाट झाल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात जसे मानेला त्रास, वेदना, ताण इतर.
4 काही दिवसाने उशीची घनता कमी होते ज्यामुळे झोपताना शरीराची ठेवण बदलते. यामुळे शारीरिक वेदनेची समस्या आढळू शकते. अनेकदा असह्य पाठ दुखीला सामोरं जावं लागतं.
5 झोप न येण्याचं काही कारण कळत नसेल तर लगेच उशी बदलून बघा.
काळजी
1 वेळोवेळी उशी धुवत राहा.
2 ओले केस किंवा केसांना तेल लावून उशीवर डोकं ठेवू नका, याने बॅक्टेरिया पसरतात. असे केल्यास उशीची खोळ धुऊन टाकावी.
3 खोळ घातल्याशिवाय उशी वापरू नका.
4 उशी कडक नसावी.
5 खूप मऊ उशी वापरणेही योग्य नाही.