आतापर्यंत आपण हेच ऐकले असणार की बटाट्याने वजन वाढते, मात्र बटाट्याने वजन वाढत नाही तर कमीसुद्धा होते. हे तुम्हाला आश्चर्यकारक वाटत असणार की बटाट्याने वजन कसे कमी होणार, पण हे खरे आहे. बटाटा वजन कमी करण्यास मदत करतो. ते कसे? तर आपण बघूया ते कशाप्रकारे होऊ शकते.
वजन कमी करण्यासाठी बटाटा उपयुक्त वजन कमी करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीने उकडलेले बटाटे थोडेसे मीठ टाकून खाल्ल्यास लाभ होतो. तसेच वजन बटाट्यामुळे वाढत नाही तर त्याला तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळल्याने वाढते. त्यामुळे बटाटावडा खाल्ल्यास वजन वाढते हा लोकांचा चुकीचा समज आहे.
बटाट्यामध्ये १६८ कॅलरी, ५ ग्रॅम प्रोटीन आणि ३ ग्रॅम फायबर असते. काही जणांच्या मते जास्त प्रमाणात बटाट्याचे सेवन डायजेस्ट रण्यासाठी त्रास होतो असे बिलकूल नाही. तुम्ही जर डायटिंग करत असाल तर बटाट्याचे सेवन करणे तुमच्यासाठी बेस्ट डाएट होऊ शकते.
उच्च रक्तदाबाशी संबंधित रुग्णांनी उकडलेल्या बटाट्यांचे सेवन करणे लाभदायक आहे. कारण बटाट्यामध्ये पोटॅशियमचा चांगला स्रोत असून यात केळीपेक्षा जास्त प्रमाणात पोटॅशिअम मिळते. एका मध्यम आकाराच्या बटाट्यातून १८ टक्के पोटॅशिअम मिळते. पोटॅशिअम उच्च रक्तदाबाला नियंत्रणात ठेवते.