भोपळ्याचे नाव ऐकूनच लोक तोंड वाकडे करतात.परंतु भोपळ्यासह त्याच्या बिया देखील खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने मोठे आजार दूर होण्यात मदत मिळते.भोपळ्यात ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळत.आपल्या दैनंदिन आहारात याचा समावेश करावा.भोपळ्याच्या बिया आयरन,कॅल्शियम,फोलेट,बीटा केरोटीन आणि बी 2 ने समृद्ध आहे.मधूमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन आवर्जून करावे.
चला यापासून मिळणारे फायदे जाणून घेऊ या.
1 भोपळ्याच्या बिया ऑक्सिडेटिव्ह कमी करून रक्तातील साखर नियंत्रित करतात. साखरेची पातळी याचे सेवन केल्यामुळे राखली जाते.या बिया आपल्या आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे.
2 भोपळ्याच्या बियामध्ये बरीच फायबर आढळतात, ते खाल्ल्याने भूक कमी होते. आणि आपले वजन देखील नियंत्रित राहतात. यासह, अनारोग्यादायी गोष्टी खाण्याची सवय देखील बंद होते.
3 भोपळ्याच्या बियामध्ये क्यूक्रबिटासिन आढळते.हा अमिनो ऍसिडचा एक प्रकार आहे.यामुळे केसांची वाढ होते.स्कल्पवर भोपळ्याच्या बियांचे तेल देखील लावू शकता.त्याच बरोबर मूठभर भोपळ्याच्या बियाचे सेवन करा.
4 या मध्ये व्हिटॅमिन ई आणि कॅरोटीनोईड मुबलक प्रमाणात आढळतात हे सूज मध्ये देखील आराम देखील देते. तसेच पेशींचे संरक्षण देखील करते.
5 या मध्ये मुबलक प्रमाणात वसा ,अँटीऑक्सीडेंट आणि फायबर आढळते.हे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.बियांचे सेवन केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत मिळते.आणि चांगले कोलेस्ट्रॉलला चांगले करते.या मुळे रक्ताभिसरण देखील चांगलं होतं.
6 मानसिक तणावामुळे लोकांची झोप व्यवस्थित होतं नाही.वेळेच्या पूर्वीच झोप उघडते.अशा परिस्थितीत भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे. या मध्ये असलेले सेरॉटेनिन चांगले असतात या मुळे नैसर्गिक झोप येते.
7 महिलांमध्ये संधिवात होणे हे सामान्य बाब आहे. परंतु वेदना जास्त वाढल्यावर मन लागत नाही.भोपळ्याच्या बियांचे तेल लावल्याने सांधेदुखीत आराम मिळतो.