अशक्तपणा जाणवल्यास किंवा चक्कर आल्यास हे लक्षणे लो ब्लड प्रेशरचे असू शकतात. अशक्तपणा, मानसिक ताणतणाव, पौष्टिक आहार न घेणे, हे कारणे लो ब्लड प्रेशरसाठी कारणीभूत असतात. लो ब्लड प्रेशरचा त्रास होऊ नये यासाठी पौष्टीक आणि संतुलित आहार घेणे, कुठल्याही गोष्टींचा ताणतणाव न घेणे. पुरेशी झोप घेणे हे महत्वाचे आहे. हे केल्यास कमी रक्तदाबाचा त्रास होत नाही.
काही घरघुती उपाय केल्याने आपण कमी रक्तदाबाची समस्या सोडवू शकता-
4- 5 बादाम रात्री पाण्यात भिजत ठेवावे आणि सकाळी त्याची साले काढून लोणी आणि साखर टाकून खाल्यास लो ब्लड प्रेशर नियंत्रित होतं.
1 चमचा मनुका रात्री काचेच्या भांड्यात भिजत ठेवाव्या आणि सकाळी त्याचे सेवन केल्याने फायदा होतो.
दर रोज आवळ्याचा मुरवळा खाल्याने पण लो ब्लड प्रेशर नियंत्रित होते.
आवळ्याच्या रसात मध घालून पिण्याने कमी रक्तदाबाचा त्रास कमी होतो.
रात्री 3 -4 खारका दुधात उकळून प्यायल्याने किंवा खारीक खाऊन दूध प्यायल्याने पण समस्या नाहीशी होती.