उपमा, शिरा, इडली व इतर अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जाणारा रवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. जर आपण पास्ता, पिझ्झा किंवा ब्रेड बनविण्यासाठी मैदा वापरत असाल तर त्याऐवजी रवा वापरणे सुरू करा. याने आपण राहाल कोलेस्टरॉल आणि ट्रांस फॅट्स फ्री. यात भरपूर मात्रेत प्रोटीन आढळतं. रवा लठ्ठपणा कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. रवा आहारात सामील करण्याचे फायदे जाणून घ्या:
मधुमेह: हे मधुमेह रोगींसाठी उत्तम आहार आहे कारण याचे ग्लायसेमिक निर्देशांक कमी असल्यामुळे शुगर वाढण्याचा धोका नसतो. मैद्यापेक्षा रवा रक्तात शोषण्यात वेळ घेतो ज्याने शुगर लेवल कमी जास्त होण्याचा धोका नसतो.
लठ्ठपणा: जेव्हा आहार हळू-हळू पचेल तेव्हा भूक लागणार नाही. यात भरपूर मात्रेत फायबर आढळतं ज्यामुळे हे हळू गतीने पचतं जे आपल्यासाठी उत्तम आहे. मुख्य म्हणजे यात फॅट्स आणि कोलेस्टरॉल आणि सोडियम नसतं.
ऊर्जा वाढते: रव्यात कार्बोहाइड्रेट अधिक असल्यामुळे शरीर ऊर्जावान राहतं. ब्रेकफास्टमध्ये रव्याने तयार केलेले पदार्थ खाल्ल्याने दिवसभर एनर्जी राहते. रवा आहारात सामील केल्याने हृदय आणि मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढते. हे हाडं, मज्जातंतू आणि स्नायूंना निरोगी ठेवण्यास मदत करतं.
संतुलित आहार: रव्यात आवश्यक पोषक तत्त्व आढळतात जसे फायबर, विटामिन बी कॉम्पलेक्स आणि विटामिन इ, मिनरल्स इत्यादी.
हार्टफ्रेंडली: आहारात रवा सामील केल्याने शरीरात रक्त प्रवाह सुरळीत कार्य करत आणि हार्ट अटॅकचा धोका टळतो.
ऍनिमियापासून बचाव: रव्यात आयरनची भरपूर मात्रा आढळल्यामुळे हे शरीरात रक्ताची कमी पूर्ण करतं आणि ऍनिमिया सारख्या रोगापासून बचाव होतो.