Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाकाळात कॅलरी कशी नियंत्रित करावी काही टिप्स

कोरोनाकाळात कॅलरी कशी नियंत्रित करावी काही टिप्स
, शनिवार, 22 मे 2021 (08:45 IST)
निरोगी राहण्यासाठी, जीवनशैली बदलणे फार महत्वाचे आहे. मग आपण तरूण असाल, म्हातारेअसाल. सध्या लोक आपल्या आरोग्याबद्दल जागरूक होत आहेत, कोरोना काळात,लोक बाहेर पडण्यास घाबरत आहे. किंवा आपल्याला हवेपासून कोरोना होऊ नये याची भीती वाटत आहे. यासाठी काही सोप्या टिप्स सांगत आहोत.
 
सकाळी मॉर्निग वॉक ला जात नसाल तर आपण आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या की अशा प्रकारे कोणत्या 5 गोष्टींवर आपण नियंत्रण ठेऊ शकता.
 
1 पराठे- जर आपण मॉर्निग वॉक किंवा इतर कोणत्याही प्रकारचे वर्क आउट करत नाही तर पराठ्याच्या ऐवजी पोळी खावे. 1 पराठ्यात सुमारे 200 कॅलरी असते.तर पोळी मध्ये खूप कमी कॅलरी असते. 
 
2 चिप्स किंवा इतर फरसाण -फरसाण हे तेलात बनवतात. जरी या मध्ये तेल नसतं तरी खाण्यात हे तेल देखील जास्त आहे. चिप्स मध्ये 200 ग्राम चिप्स मध्ये सुमारे 600 कॅलरी असते.
 
3 आईस्क्रीम -उन्हाळ्याचा हंगाम आहे, आईस्क्रीम खावीशी वाटते. पण आपण आपल्या आळशीपणा मुळे वॉक जात नसाल तर ही कॅलरी आपल्या पोटात साचते 1 कप आईस्क्रीम मध्ये सुमारे 600 कॅलरी असते. 
 
4 छोले भटुरे- आता हळू-हळू हवामान बदलत आहे. काही गरम खाण्याची इच्छा होते. गरम छोले भटुरे कोणाला आवडत नाही. परंतु भटुरे मैदा पासून बनतात आणि ते ही तेलात. प्रयत्न करा की अशा प्रकारचे खाद्य पदार्थ खाणे टाळा. 
 
5 मिल्क शेक - उन्हाळ्याच्या हंगामात गरम दुधा ऐवजी थंड मिल्कशेक किंवा कोल्डड्रींक्स पिणे आवडते. हे पिऊन थंडावा जाणवतो. अशक्तपणा देखील जाणवत नाही. एक ग्लास मिल्कशेक मध्ये सुमारे 750 कॅलरी असते. हे बर्न करण्यासाठी आपल्याला सुमारे 70 मिनिटांसाठी दोरी उड्या घ्यावा लागतील. असं केल्याने ती कॅलरी बर्न होईल. 
आता आपल्याला समजले असणार की मॉर्निग वॉक करू शकतं नाही तर आपल्याला काय खायचे आहे आणि कशात किती कॅलरी आहे.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हैप्पी हायपोक्सिया म्हणजे काय, लक्षणे आणि निराकरण जाणून घ्या