Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पायांना आराम देण्यासाठी सरळ उपचारपद्धती

पायांना आराम देण्यासाठी सरळ उपचारपद्धती
, गुरूवार, 14 जानेवारी 2021 (10:52 IST)
कामाच्या निमित्ताने सतत एका जागेवर बसून काम केल्याने पाय कडक होतात. ऑफिसमध्ये एकाजागी तासनतास बसून काम करावे लागल्यामुळे ह्या समस्यांच्या तोंड जावे लागाते. तसेच पाठदुखीचाही ‍त्रास होत असतो. 
 
खाली दिलेल्या गोष्टींमुळे आपण पायांना आराम मिळवू शकता. 
सर्वप्रथम जमिनीवर पाय समोर पसरून बसा. 
उजवा पाय गुडघ्यात वाकवून आपल्या डाव्या पायाच्या गुडघ्यावरून डाव्या पायापलीकडे ठेवा. 
उजव्या पायाचा गुडघा हाताने दाबून डाव्या खांद्याकडे न्या. 
आपण आपल्या नितंबाला व कंबरेतील पेशींमध्ये तणाव जाणवाल तेव्हा आपली पाठ ताठ ठेवावी. 20 सेकंद ह्याच मुद्रेत राहून पाय जमिनीवर पसरावा. 
तसेच उजवा पाय पसरून हाच व्यायाम डाव्या पायावर करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तिळगुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे