rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या प्रकारे घ्या टूथब्रशची काळजी

tooth brush
, सोमवार, 9 डिसेंबर 2019 (18:08 IST)
टूथब्रश आपल्या डेली रूटीनमधील महत्त्वाचा भाग आहे. टूथब्रशची योग्य प्रकारे सफाई न केल्यास ती तिसरी सर्वात घाणेरडी जागा आहे. घाणेरड्या टूथब्रशमुळे डायरिया तसेच स्किन इन्फेक्शन होऊ शकते. यातच दातांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या टूथब्रशचे आरोग्य चांगले राखणे गरजेचे असते.

जाणून घ्या कशी घ्याल टूथब्रशची काळजी अधिकजण सकाळी उठल्यावर ब्रश करण्याआधी ब्रश पाण्याने धुतात. जेव्हा आपण ब्रश पाण्याने ओला करतो तेव्हा ब्रशच्या तारा पातळ होतात. यामुळे दातांना ब्रश करण्याची क्षमता कमी होते. डॉक्टरांच्या मते असे करू नये.

ओल्या टूथब्रशवर टूथपेस्ट लावल्याने ती पेस्ट डायल्यूट होते ज्यामुळे त्याचा प्रभावही कमी होतो. दरम्यान दात साफ करताना टूथब्रश ओले करू नका आणि जर करणे गरजेचे असेल तर एका सेकंदाहून अधिक वेळ ब्रश पाण्याखाली ठेवू नका.
 
घरे लहान असल्याने बाथरूही लहान असतात. काही घरांध्ये तर टॉयलेट आणि टूथब्रश ठेवण्याचा सिंक जवळ असतो. यावेळी शौचनंतर फ्लश केल्यास हवेतील किटाणू ब्रशवर बसतात. यामुळे टूथब्रश स्टँड हे कमोडच्या दोन फूट अंतरापेक्षा अधिक अंतरावर असेल याची काळजी घ्यावी. आपल्या टूथब्रश होल्डरला आठवड्यातून दोनवेळा जरूर साफ करा. या होल्डरमध्ये जमा झालेले किटाणू तुमच्या ब्रशला लागणार नाहीत.
 
आजकाल बाजारात ब्रशसोबत ब्रिसल झाकून ठेवण्यासाठी बॉक्स मिळतो. मात्र ब्रश बंद करून ठेवणे योग्य नव्हे. यामुळे ब्रशमध्ये किटाणू तसेच राहतात. यासोबतच टूथब्रश वापरल्यानंतर ते उभे करून ठेवा ज्यामुळे त्यात पाणी राहणार नाही.
 
टूथब्रशबाबतची एक चूक सगळेच करतात. संपूर्ण कुटुंबाचे ब्रश एकाच ठिकाणी ठेवले जाते. डॉक्टरांच्या मते यामुळे एका टूथब्रशवरील किटाणू दुसर्‍या टूथब्रशवर जातात म्हणून असे करणे टाळा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आपल्या पर्सनॅलिटीला कोणती हँडबॅग सूट करेल जाणून घ्या