suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रत्येक फळ खाण्यासाठी काही नियम आहेत, जाणून घ्या

There
उन्हाळ्याच्या हंगामात रसाळ फळांची जणू बहारच  येते. परंतु आपणास माहित आहे की प्रत्येक फळ खाण्याचे देखील काही नियम आहे.जाणून घ्या काय आहेत ते नियम.
 
1  संत्री - सकाळी आणि रात्री खाऊ नये.दिवसात खावे. जेवण्याच्या 1-1 तासापूर्वी किंवा नंतर खा. जेवण्याच्या पूर्वी घेतल्याने भूक वाढते आणि नंतर घेतल्याने अन्न पचण्यास मदत होते.
 
2 मोसंबी - मोसंबी दुपारी खावी. उन्हात जाण्यापूर्वी किंवा उन्हातून आल्यावर मोसंबी खाणं किंवा मोसंबीचा रस घेणं फायदेशीर आहे. या मुळे शरीरात पाण्याची कमतरता होत नाही. 
 
3 द्राक्ष -किंवा द्राक्षाचा रस शरीरातील पाण्याचे प्रमाण राखून ठेवतो.उन्हात जाण्यापूर्वी किंवा उन्हातून आल्यावर याचे सेवन करावे. परंतु द्राक्ष खाण्यात आणि जेवण्यात काहीसे अंतर असावे. 
 
4 नारळ पाणी- तसे तर नारळपाणी कधीही पिऊ शकतो, ज्यांना पोटाची समस्या आहे, किंवा ऍसिडिटी,किंवा अल्सरची समस्या आहे त्यांच्या साठी हे फायदेशीर आहे. शक्यतो अनोश्यापोटी नारळपाणी पिऊ नका. 
 
5 आंबा- आंब्याची प्रकृती उष्ण असते म्हणून आंब्यासह नेहमी दुधाचा वापर करावा. आंबा कापून खात असाल तर आंब्याच्या तुकड्यां मध्ये साखर आणि थोडंसं दूध मिसळून पिणे फायदेशीर ठरेल. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Government Job Vacancy परीक्षेशिवाय नोकरीची संधी