Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उन्हाळ्यासाठी हे 8 आरोग्यवर्धक शरबत फायदे देतील

उन्हाळ्यासाठी हे 8 आरोग्यवर्धक शरबत फायदे देतील
, गुरूवार, 11 मे 2023 (10:25 IST)
उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये या साठी दिवसभर भरपूर पाणी पिण्याव्यतिरिक्त रोजच्या नित्यकर्मांमध्ये या शरबताचा समावेश करा, आरोग्याला बरेच फायदे होतील. चला आम्ही आज  8 रसाळ शरबतांबद्दल सांगत आहोत जे उन्हाळ्याच्या काळात पिणे  फायदेशीर ठरेल -
 
1 दुधीभोपळ्याचा रस - हे एक चमत्कारिक पेय आहे. जो थंडावा देतो. 
युनानी औषधामध्ये, बर्‍याच रुग्णांना उन्हाळ्याच्या हंगामापासून उष्णतेपासून बचाव करण्यासाठी दुधी भोपळ्याचा रस वापरण्याचा सल्ला दिला जातो.हे व्हिटॅमिन सी आणि बी 6 चा उत्कृष्ट स्रोत आहे. यात कॅल्शियम, आयोडीन, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखे आवश्यक खनिजे देखील असतात. सकाळी अनोश्यापोटी  एक ग्लास दुधीभोपळ्याचा रस संपूर्ण दिवसासाठी थंडावा देतो. त्यात  चिमूटभर मीठ घातल्याने  शरीरात सोडियमची कमतरता उद्भवत नाही. हे तहान शमवते आणि समाधान देते. पोटाचे आजार यामुळे निश्चितच बरे होतात.
 
2 कैरीचे पन्हे - या हंगामात कैऱ्या येऊ लागतात पुदिन्यासह हे वाटून पितात. उष्णता किंवा उन्हाळी लागलाय असल्यास पन्हे हे उत्तम मानले आहे. या मध्ये व्हिटॅमिन सी,बी -1 ,बी-2 आणि नियासिन असते. या मुळे मीठ आणि लोह घटकांची कमतरता होत नाही. पचन चांगले ठेवण्यात देखील पन्हे उत्कृष्ट आहे.  
 
3 उसाचा रस- हा ग्लूकोजचा सर्वात मोठा स्रोत मानला जातो. एक ग्लास उसाचा रस त्वरित ऊर्जा देतो. तसेच सूर्यप्रकाशामुळे आणि घामामुळे शरीरातून बाहेर पडणार्‍या खनिज लवणांचा पुरवठा होतो. लोह घटकांचा हा एक उत्तम स्त्रोत मानला जातो. आपण मधुमेहाचे रुग्ण असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.
 
4  रूह अफ्जा- हे युनानी पद्धतीने बनविलेले शरबत आहे.जे तहान शमविण्यासाठी उत्तम मानले आहे.त्यात वापरली जाणारी औषधी वनस्पती शरीरातील पाण्याची पातळी राखून ठेवण्यास मदत करते. हे डिहायड्रेशन आणि सनस्ट्रोक सारख्या समस्या देखील टाळते. तसेच अतिसार, पोटदुखी, अपचन वगैरेपासून मुक्तता देते . 
 
5 लिंबू सरबत- लिंबू सरबत शरीरात आवश्यक मीठ आणि साखरेच्या रूपात ऊर्जा देते. त्याला व्हिटॅमिन सी चा खजिना म्हणतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
 
6 पपईचा रस- मांसाहारी आणि कमकुवत पचनशक्ती असलेल्या रुग्णांसाठी पपईचा रस फायदेशीर आहे.असे रुग्ण ज्यांना प्रथिने पचविण्यासाठी एंझाइम पूरक आहार आवश्यक आहे त्यांना हे मदतगार आहे. गरोदर महिलांनी हे पिऊ नये. 
 
7 नारळाचे पाणी- संपूर्ण उत्तर भारतामध्ये नारळ पाणी आढळते. या पेक्षा अधिक वेगाने ताजे तवाने करणारे कोणतेही वेगवान पेय नाही. एक ग्लास कच्चा हिरव्या नारळाचं पाणी उत्तम नैसर्गिक आरोग्य पेय मानला जातो. हे शरीरातून विषारी द्रव्ये काढण्यात अतुलनीय आहे. तसेच शरीराचे पीएच मूल्य राखते. हे कोणत्याही रोगाने ग्रस्त रुग्णाला दिले जाऊ शकते.
 
8 कलिंगडाचे रस -कलिंगड अरब देशातून हिंदुस्थानात पोहोचला आहे. तहान शमवणाऱ्या महत्वपूर्ण शरबतांमध्ये याचा समावेश आहे. यात मुबलक प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स असतात या मुळे सोडियम आणि पोटॅशियम ची कमतरता होत नाही. हे दोन्ही क्षार घामातून बाहेर पडतात. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Executive MBA Finance: :फायनान्समध्ये एक्झिक्युटिव्ह एमबीए कोर्स करून करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम शीर्ष महाविद्यालय,पगार व्याप्ती जाणून घ्या