Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लठ्ठपणा कमी करून हिवाळ्यात शरीरात गरमी आणतो नॉनवेज सूप

लठ्ठपणा कमी करून हिवाळ्यात शरीरात गरमी आणतो नॉनवेज सूप
, मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019 (18:18 IST)
हिवाळ्यात बरेच लोक नॉनवेज सूप पितात. याचे मुख्य कारण म्हणजे नॉनवेज सुपाचे पौष्टिक होणे. थंडीत शरीरात गरमी आणण्यासाठी तुम्ही देखील नॉनवेज सूप ट्राई करू शकता. हे सूप चविष्ट असून फार फायदेशीर देखील आहे. एवढंच नव्हे तर यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असत, जे शरीरात कोशिकांचे निर्माण करून प्रतिरोधक क्षमता वाढवतो आणि शरीराला ऊर्जा प्रदान करतो.
 
गळा दुखत असल्यास त्यात आराम
जास्तकरून या मोसमात थंड गरम किंवा आंबट पदार्थांचे सेवन केल्याने गळा खराब होतो आणि टॉन्सिल्स वाढून जातात. अशात चिकन सूपचे सेवन केल्याने गळ्याला आराम मिळतो आणि दुखणे कमी होण्यास मदत मिळते. यात असलेले सोडियमची प्रचुर मात्रा तोंड आणि गळ्यातून टॉन्सिल्सचे बॅक्टीरिया दूर करण्यास मदत करतात.
 
साइनसपासून बचाव करतो  
हिवाळ्यातील हा मोसम साइनसच्या रुग्णांसाठी फारच त्रासदायक ठरतो. गरमागरम चिकन सूप बंद नाक उघडण्यात मदत करतो. रोज याचे सेवन केल्याने सायनसचा त्रास कमी होण्यास मदत मिळतो.
 
मसल्स बनवा 
चिकन प्रोटिनाचा योग्य स्रोत आहे, जे शरीरात अमीनो ऍसिडची मात्रा वाढवते आणि मसल्स व टिशूजचे निर्माण करून शरीराला मजबूत बनवते.
 
पाण्याची कमतरता दूर करतो 
शरीरात पाण्याची कमतरता बर्‍याच प्रकारच्या आरोग्याशी निगडित समस्यांना वाढवते. या मोसमात पाण्याची कमी दूर करण्यासाठी तुम्ही चिकन सुपाचा उपयोग करू शकता. चिकन सुपामध्ये अर्ध पाणी असत. कुठले ही तरल पदार्थ शरीरात पाण्याची कमतरता पूर्ण करण्यास मदत करतात. त्याशिवाय हे विभिन्न प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून बचाव करण्यास मदत करतो.
 
आर्थराइटिसमध्ये फायदेशीर
चिकन सुपामध्ये विटामिन बी आणि प्रोटिनाची उत्तम मात्रा असते, जे तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. म्हणून आर्थ्रायटिसच्या रुग्णांना चिकन सूप फारच फायदेशीर आहे. याच्या सेवनामुळे हाड मजबूत होतात.
 
रक्ताच्या कमतरतेला दूर करण्यास मदत मिळते
शरीरात रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी चिकन सुपाचा प्रयोग फारच प्रभावी मानण्यात आला आहे. असे यासाठी कारण चिकन सुपामध्ये फारच उपयोगी पोषक तत्त्वांसोबत आयरनची चांगली मात्रा असते. आयरन शरीरात रक्ताची कमी दूर करून लाल रक्त कोशिकांचे निर्माण करण्यास मदत करतो. थकवा, सुस्ती आणि मसल्सच्या कमजोरी दूर करण्यासाठी चिकन सूप फार फायदेशीर आहे.
 
पोटावरची चरबी कमी करतो  
तुम्ही जर लठ्ठपणामुळे त्रस्त असाल तर, चिकन सुपाची मदत घ्या. प्रोटिनाने भरपूर असल्यामुळे हे पोटावरची चरबी कमी करण्यास मदत करतो. नॉनवेज सुपामध्ये उपस्थित वसाची अल्प मात्रा तुमचे मस्तिष्क, त्वचा आणि मांसपेश्यांसाठी फारच फायदेशीर आहे. पर्याप्त मात्रेत चिकन सुपाचे सेवन भुकेला नियंत्रित करते आणि वाढत असलेली चरबीला थांबवतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवऱ्या मुलासाठी उखाणे