Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मास्कमुळे त्वचेला नुकसान तर होत नाहीये, याप्रकारे करा देखभाल

मास्कमुळे त्वचेला नुकसान तर होत नाहीये, याप्रकारे करा देखभाल
, शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (10:23 IST)
मास्क वापरणे अत्यंत आवश्यक आहे परंतू मास्कचा अधिक काळ वापर केल्याने चेहर्‍यावर डाग, मुरुम तसेच कानाच्या त्वचेवर ताण येणे अशा समस्या उद्भवू शकतात. याहून आराम मिळवा यासाठी काही टिप्स- 
 
मास्कचा उपयोग करण्यापूर्वी आणि केल्यानंतर आपला चेहरा स्वच्छ सुगंधविरहित क्लींझरने स्वच्छ करा.
चेहर्‍यावर मॉइश्चराइझर लावा. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चराइझरची निवडा. त्वचा तेलकट असल्यास जेल मॉइश्चराइझर, सामान्य किंवा संमिश्र त्वचेसाठी लोशन आणि कोरड्या त्वचेसाठी क्रीमचा उपयोग योग्य ठरेल.
त्वचेला नुकसान करणार्‍या ब्युटी प्रोडक्ट्सपासून दूर राहा. मेकअपमुळे त्वचेवरील रोमछिद्रे बंद होतात आणि मुरुम येण्याची शक्यता वाढते. 
मेकअप करणं आवश्यक असल्यास नॉन-कॉमेडोजेनिक प्रोडक्ट वापरा.
मास्कमुळे त्वचेवर घर्षण होत असल्यास स्किन गार्ड झिंक ऑक्साइडचा वापर करा. हे नाकावर किंवा कानामागे लावू शकता.
त्वचेवरील मुरुम कमी करण्यासाठी अँटी-बायोटिक मलम लावा.
सतत मास्क लावावा लागत असल्या दर दोन तासांमध्ये ५ मिनिटांसाठी मास्क ब्रेक घ्या. मास्क काढताना आपण सार्वजनिक ठिकाणी नाही हे सुनिश्चित करा.
अधिक घट्ट किंवा अधिक सैल मास्क वापरू नका. 
सिंथेटिक, नायलॅान किंवा पॉलिस्टर फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेले मास्क न वापरता कापडाचे आरामदायक मास्क वापरावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुरकुरीत भजी व्हावी यासाठी त्यात हे घाला