Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सतत थकवा जाणवत असेल तर हे करून बघा

stress relief
, मंगळवार, 7 मार्च 2023 (11:03 IST)
सतत थकवा जाणवण्यामागे कोणतंही एक कारण नाही. डिप्रेशनग्रस्तांना थकवा जाणवतो. भूक कमी होते. यामुळे झोपेवरही दुष्परिणाम जाणवतो. ताण ओळखून दूर करण्याचा प्रयत्न केल्यास थकवा दूर होतो. 
 
डिप्रेशन दूर करण्यासाठी समुपदेशन आणि जीवनशैलीतील बदल हे विषयदेखील महत्त्वाचे ठरतात. सायकोथेरपीद्वारे या गर्तेतून बाहेर पडता येते. यासाठी कोग्रीटिव्ह थेरपी किंवा हिप्नोथेरपीचे सहाय्य मिळू शकते.
 
व्हिटॅमिन डी किंवा बी-१२ची कमतरता हेदेखील थकव्यामागचे एक मोठे कारण आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता कमी करण्यासाठी सूर्यप्रकाशात फिरण्याचा उपाय अवलंबता येतो. व्हिटॅमिन बीची कमतरता कमी करण्यासाठी सुकामेवा, अंडी, चिकन तथा पनीरचं सेवन वाढवायला हवं.
 
सालमन माशाचं सेवनही यासाठी परिणामकारक आहे. टॉन्सिल्सचा त्रास असेल, निद्रानाशाचा त्रास असेल, सततच्या सर्दीमुळे नाक बंद राहण्याचा त्रास होत असेल तरी थकवा जाणवतो. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

होळी विशेष पुरण पोळी