Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 26 April 2025
webdunia

द्राक्षे कधी खाऊ नयेत? महत्तवाची माहिती जाणून घ्या

When To Stop Consuming Grapes
, गुरूवार, 16 मे 2024 (12:25 IST)
When should you avoid grapes द्राक्षे हे अतिशय चवदार आणि आरोग्यदायी फळ आहे. द्राक्षांमध्ये रक्तदाब कमी करणे आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणे यासारखे अनेक उपयुक्त गुणधर्म आहेत. द्राक्षांमध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. हे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान नियंत्रित करण्यास मदत करते आणि कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराचा धोका कमी करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. द्राक्षांचे सर्व फायदे असूनही, काही परिस्थिती आहेत जेव्हा द्राक्षे खाऊ नयेत.
 
पोटात वेदना होत असल्यास द्राक्ष खाणे टाळावे- जर एखाद्याला आधीच पोट दुखत असेल तर द्राक्षांचे सेवन टाळावे. पोटदुखीची अनेक कारणे असू शकतात, जसे की अन्नाची ऍलर्जी, अन्नातून विषबाधा इ. अशा परिस्थितीत द्राक्षांपासून दूर राहणे चांगले.
 
अतिसार - अतिसार झाल्यास द्राक्षे खाणे टाळावे. अतिसार म्हणजे उलट्या आणि जुलाब. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे एखाद्याला एकाच वेळी उलट्या आणि जुलाब होत असतील तर द्राक्षे खाऊ नयेत. द्राक्षांमुळे तुमची स्थिती बिघडू शकते. जुलाब झाल्यास खिचडी, दलिया असे हलके अन्न खाऊ शकतो.
 
अॅलर्जी- काही लोकांना द्राक्ष खाल्ल्याने अॅलर्जी होऊ शकते. मात्र अनेक वेळा लोकांना याची माहिती नसते. तुम्हाला द्राक्षांपासून ऍलर्जी आहे का हे शोधण्यासाठी, तुमच्या लक्षणांकडे लक्ष द्या. जर तुम्ही द्राक्ष खाल्ल्याबरोबर पोटदुखी किंवा उलट्या होऊ लागल्या आणि असे वारंवार होत असेल तर समजून घ्या की तुम्हाला द्राक्षांची ॲलर्जी आहे. अशा परिस्थितीतही तुम्ही द्राक्षे खाणे टाळावे.
 
प्रेग्नेंसी दरम्यान - सर्वसाधारणपणे महिलांनी गर्भधारणेदरम्यान सर्व निरोगी फळे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे. परंतु अनेक आरोग्य तज्ञ सल्ला देतात की गर्भधारणेदरम्यान द्राक्षे खाणे धोकादायक असू शकते. विशेषतः, गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत ते सेवन करणे योग्य नाही. द्राक्षाच्या सालीमध्ये रेझवेराट्रोल नावाचे संयुग असते. तज्ञांच्या मते रेझवेराट्रोल हे पोषक तत्व आहे, परंतु गर्भवती महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन होऊ शकते. याचा वाईट परिणाम त्यांच्या गर्भात वाढणाऱ्या बाळावर होतो. याशिवाय द्राक्षांवर विशेष प्रकारचे कीटकनाशक फवारले जाते, जे धुऊनही काढता येत नाही. द्राक्षे सालासह खाल्ल्यास त्याचा परिणाम गर्भातील गर्भावर होतो.
 
किडनी स्टोन असल्यास - तसं तर अजूही ठामपणे असे सांगता येणार नाही की किडनी स्टोनवर द्राक्षाचा कशा प्रकारे प्रभाव पडतो तरी एक्सपर्ट्सच्या मते जर एखाद्याला किडनीशी संबंधित आजार होत असेल आणि मुतखडा वारंवार होत असेल तर त्यांनी द्राक्षे खाणे मर्यादित केले पाहिजे. याचे कारण द्राक्षांमध्ये असलेले ऑक्सलेट घटक असल्याचे मानले जाते. ऑक्सलेट हे एक रसायन आहे जे आपले शरीर स्वतः तयार करते. शरीरात त्याचे प्रमाण वाढले तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
 
डायबिटीज - मधुमेह ही एक गंभीर समस्या आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी आणि योग्य आहाराचे पालन करावे. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याची आणि आहाराची काळजी घेतली नाही तर त्यांच्या रक्तातील साखर वाढू शकते. ही स्थिती प्राणघातक ठरू शकते. त्यामुळे कोणाला मधुमेह असेल तर त्यांनी द्राक्षे खाणे टाळावे.
 
अस्वीकरण : चिकित्सा, आरोग्य संबंधी उपाय, योग, धर्म, ज्योतिष इतर विषयांवर वेबदुनिया मध्ये प्रकाशित लेख व समाचार केवळ आपल्या माहितीसाठी आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संबंधी कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डेंग्यूच्या डासांपासून मुक्त होण्यासाठी घरी Mosquito Spray बनवा