Food avoid with curd दही स्वादिष्ट असल्यासोबतच पोषक तत्वांनी भरपूर असते. दही हे शरीरातील प्रोटीनच्या कमीला भरून काढते. पण तुम्हाला माहित आहे का दह्यासोबत सर्व पदार्थ सेवन करू शकत नाही. असे काही पदार्थ आहे जे आपण दहीसोबत सेवन करू शकत नाही चला तर जाणून घेऊया असे पदार्थ कोणते-
१. मासे- मासे याबरोबर कधीही दही सेवन करू नये. दोघांमध्ये प्रोटीन असते पण दोघांची प्रकृती वेगवेगळी असते. या दोघांचे सोबत सेवन केल्याने पोटात इंफेक्शन, उलटी, बद्धकोष्ठता होऊन सोबत तब्येत पण ख़राब होते.
२. तळलेले पदार्थ : आपण पाहतो की खूप लोक तळलेल्या पदार्थांसोबत दही खातात जसे की भजी, पराठे यासोबत दही खातात पण तुम्हाला माहित आहे का हे आरोग्यासाठी घातक असते. दही अशा प्रकारच्या
पदार्थांना पचवण्यासाठी अवरोध करते यामुळे पचन होत नाही तसेच दही पासून मिळणारे पोषकतत्व पण मिळत नाही.
३. आंबा - आंबा या फळाला दही सोबत सेवन केल्यास आपल्याला फूड पॉइजन होण्याची शक्यता असते. दोघांची प्रकृती वेगळी असते. आंबा गरम असतो आणि दही थंड असते. अशामुळे पोटात विषारी पदार्थ बनण्याची संभवना असते.
४. कांदा - दही सोबत कांदा खाणे ही सामान्य गोष्ट आहे. यांचे मिश्रण म्हणून रायता तसेच चटनी तयार करतात. पण हे पोटासाठी घातक आहे या दोघांना एकत्रित सेवन केले तर गॅस आणि एसिडिटीची समस्या वाढते.
५. दूध - दहीला दुधासोबत पण काही सेवन करतात मात्र यांची पण वेगवेगळी प्राकृती असल्याने यांना सोबत सेवन करणे घातक असते यामुळे अपचन आणि ऐसिडीटीची समस्या निर्माण होते.