Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

World Health Day 2022: निरोगी राहण्यासाठी अमलात आणा हे नियम

health
, बुधवार, 6 एप्रिल 2022 (13:45 IST)
-दररोज लवकर बिछाना सोडा.
-सकाळी किमान 20 मिनिटे तरी व्यायाम करावे. असं केल्याने आपण दिवसभर ऊर्जावान आणि आनंदी अनुभवाल.
-सकाळच्या न्याहारीसाठी मोड आलेले कडधान्य, एक तरी हंगामी फळ आणि काही सुकेमेवे खावे. प्रयत्न करा की न्याहारी 8 वाजे पर्यंत घेतलीच पाहिजे. आपण ताजे फळाचे ज्यूस देखील घेऊ शकता.
-निरोगी राहण्यासाठी जेवण केल्यावर किंवा अंघोळीच्या पूर्वी आणि झोपण्याच्या पूर्वी लघवी करून झोपावे. या मुळे शारीरिक तापमान सामान्य होतो.आणि झोपण्यापूर्वी लघवी केल्याने झोप चांगली येते.
-निरोगी राहण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचे आहे की सकाळी उठून किमान 3 ते 4 ग्लास पाणी प्यावे. सकाळी लवकर उठून ब्रश न करता 3 ते 4 ग्लास कोमट पाणी प्या.
-असं केल्याने आपल्या शरीरातील विषारी टॉक्सिन बाहेर निघून जातील. या मुळे आपण निरोगी राहता. लक्षात ठेवा की पाणी प्यायल्यावर आपल्याला 45 मिनिटे काहीच खायचे नाही.
-जेवल्यानंतर पाणी प्यायल्याने जठारअग्नी कमी होते.अन्न पचत नाही. म्हणून जेवण्याच्या किमान 45 मिनिटा नंतर पाणी प्यावे. पाणी कोमट असेल तर अधिकच चांगले.
-साखर घेणे बंद करा. किंवा कमी करा. साखर बंद करणे शक्य नसेल तर मध, खडीसाखर, गूळ वापरा. मिठाचे प्रमाण देखील कमी करा. मीठ देखील सेंधव वापरा.
-ध्यान करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. सकाळी आणि संध्याकाळी किमान 15 मिनिटे तरी ध्यान केले पाहिजे. या मुळे आपली सर्व काळजी आणि तणाव नाहीसे होतात. आणि आपण निरोगी आणि आनंदी अनुभवता.
-झोप पूर्ण न झाल्याने देखील अनेक रोग होतात. संपूर्ण दिवस खराब होतो. अस्वस्थता जाणवते. किमान 6 -8 तासाची झोप तरी घेतली पाहिजे. या मुळे शरीराला आराम मिळतो. आणि आपण ऊर्जावान अनुभवतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Health day जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो, इतिहास जाणून घ्या