Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 28 April 2025
webdunia

Yellow Fungus काय आहे? 'पिवळ्या बुरशी' चे लक्षणं, बचाव आणि खबरदारी

Yellow Fungus cases in Indian
, सोमवार, 24 मे 2021 (17:46 IST)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होत आहे, तसेच संसर्ग दरही कमी होऊ लागला आहे. पण कोविडनंतर इतर गंभीर रोग लोकांचा बळी घेत आहेत. होय, पोस्ट कोविडनंतर ब्लॅक फंगस रोग प्रकट झाला. त्यानंतर पांढरे बुरशीजन्य रोग आणि आता पिवळ्या बुरशीचे आजार समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा रोग पांढरा आणि काळा बुरशीपेक्षा जास्त प्राणघातक असल्याचेही म्हटलं जातं आहे. चला हा रोग कसा ओळखावा हे जाणून घ्या, त्याची लक्षणे कोणती आहेत, त्यावर उपचार करणे शक्य आहे का?
 
Yellow Fungus Symptoms
 
- भूक कमी होणे किंवा भूक न लागणे
- सुस्तपणा
- वजन कमी होणे
- डोळे खोल जाणे
- जखम मंद गतीने बरे होणे
-अवयवांची हालचाल अचानक थांबणे
- कुपोषण
 
का घातक आहे यलो फंगस?
हा आजार शरीरात होत आहे. त्याची लक्षणे देखील सामान्य दिसतात. लक्षण ओळखण्यात विलंब धोकादायक सिद्ध होत आहे. लक्षणे दिसताच उपचार सुरू करणे फार महत्वाचे आहे. हे हळूहळू आपल्या शरीरातील सर्व अवयवांना हानी पोहोचवू शकते.
 
पिवळ्या बुरशीचे कारण
या बुरशीचे कारण घाण आणि ओलावा सारखेच आहे. आपल्या घराभोवती स्वच्छता ठेवा. बुरशीचे प्रतिबंध करण्यासाठी, आसपास आर्द्रता अजिबात ठेवू नका. जुन्या गोष्टी फ्रीजमधून बाहेर काढा. स्वच्छतेची काळजी घ्या.
 
पिवळ्या बुरशीपासून बचावासाठी उपाय
भरपूर पाणी प्या
प्रतिकारशक्ती मजबूत ठेवा
आजूबाजूला घाण ठेवू नका
घरात ओलावा नसवा
ताजे अन्न खा, शिळे अन्न खाऊ नका

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करियरमध्ये यशप्राप्ती साठी या टिप्स अवलंबवा