Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओठांच्या रंगाने जाणून घ्या आपले आरोग्य

ओठांच्या रंगाने जाणून घ्या आपले आरोग्य
सर्वसाधारणपणे ओठांचा रंग गुलाबी असतो पण प्रत्येकाचे ओठ गुलाबी असतातच असे नाही. ओठांचा रंग हलका पिवळा, पांढरा किंवा अजून कोणताही शेड घेतलेला असू शकतो. आपल्या ओठांचा हाच रंग आपल्या आरोग्याबद्दल माहिती देतो. जाणून घ्या:
हलका पिवळा- जर आपले ओठ गुलाबी आहे पण त्यात हलका पिवळेपणा आहे तर हे ऍनिमियाचे लक्षण दर्शवतं. याचा अर्थ आपल्या शरीरात हिमोग्लोबिन आणि लाल रक्त पेशींचा अभाव आहे. अशात तज्ज्ञ आयरन आणि व्हिटामिन सी आढळणार्‍या पदार्थांचे सेवन करायचा सल्ला देतात.

गडद लाल- ओठांचा हा रंग आरोग्याच्या दृष्टीने गंभीर विषय आहे. याचा अर्थ आहे की आपला लिव्हर कमजोर आहे आणि आवश्यकतेपेक्षा अधिक व कठीण परिस्थितीत कार्य करत आहे.
webdunia

जांभळा किंवा हिरवा- ओठांचे रंग बदलणे साधारण घटना नाही. काही परिस्थित किंवा हिवाळ्यात ओठांचे रंग जांभळा किंवा हिरवा पडणे हृदय आणि फुफ्फुसासाठी धोकादायक आहे.
webdunia



गडद जांभळा- काही लोकांच्या ओठांचा रंग गडद जांभळा दिसतो. हा पचन प्रणालीत बिनसल्याचे संकेत देतं. अशात आपल्याला फायबर आणि मिनरल्स आढळणार्‍या पदार्थांचे सेवन करायला हवे. अशात शिळं अन्न, फास्ट फूड हे टाळावे.
webdunia

जांभळे कडे- जर आपल्या ओठांचे कडे जांभळे आहे तर आपल्या शरीरातील संतुलन गडबडलंय. अशात आपल्या शरीराच्या तापमानामध्ये बदल जाणवेल. अशात आपल्याला आराम करण्याची आणि हेल्दी पदार्थ सेवन करण्याची गरज आहे.
webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मिठाचे काही चमत्कारिक प्रयोग, नक्की करून पहा!