Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दारू पिऊन लगेच झोपल्याचे दुष्परिणाम

दारू पिऊन लगेच झोपल्याचे दुष्परिणाम
अनेक लोकं यासाठी दारू पितात की याने सर्व काळजी दूर होऊन चांगली झोप लागेल. पण दारू पिण्याने शरीर थोड्या वेळासाठी तर रिलॅक्स होते पण याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. 
* रात्री अधिक मात्रेत दारू प्यायल्यामुळे आपल्याला वारंवार लघवीसाठी उठावं लागतं ज्याने केवळ झोप चाळी होत नसून डिहाइड्रेशनही होतं. म्हणून दारू प्यायल्यावर शरीराला अतिरिक्त दारू बाहेर निघण्यासाठी वेल द्यायला हवा.

* अधिक मात्रेत दारू पिण्याने झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. दारू पिण्याने लवकर झोप येते ज्याने झोपेची नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम होतो. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर इतर दिवसांसारखी स्फूर्ती आणि ताजेपणा जाणवतं नाही. अनेक लोकांचे होश हरवल्यामुळे केवळ त्यांना असं वाटतं की खूप छान झोप झाली.
webdunia
याने हार्ट रेट वाढून जातं. अधिक दारू पिण्याने उच्च रक्तदाबाची समस्या होते ज्याचा परिणाम हृदयावर होतो.

* दारू पिण्याच्या सवयीमुळे आपल्या स्मृतीवर परिणाम होतो. याने विसरण्याची सवय लागते. दारू पिऊन झोप झाली की आपल्या आठवणीतले कित्येक तरी क्षण पुसले जातात.
webdunia
दारू पिऊन वारंवार लघवी लागते, घाम फुटतो आणि डिहाइड्रेशनची तक्रार होते ज्याचा परिणाम किडनीवर होतो.

* दारू आपल्या रक्तात मिसळली गेली की ती आपल्या स्नायूंना रिलॅक्स करते. याने गळ्यातील स्नायूही रिलॅक्स होतात आणि त्यामुळे घोरण्याचा आवाज येतो.
webdunia
अधिक मात्रेत दारू प्यायला असाल तर भरपूर झोप झाल्यानंतरही डोकं जड वाटतं, चक्कर येतात आणि थकवा जाणवतो. जोपर्यंत दारूचा प्रभाव संपत नाही तोपर्यंत शरीरात स्फूर्ती नसल्यामुळे काहीही काम करणं जड जातं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कच्च्या केळ्यांची भाजी