Article Marathi Health Tips %e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4 %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%be %e0%a4%ab%e0%a4%bf%e0%a4%9f 110040900027_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रवासात राहा फिट

प्रवासात राहा फिट चक्कर येणे घामोळ्या ऊन लागणे
ND
उन्हाळ्यात फिरायला जायचे म्हटले की आरोग्याच्या लहान-मोठ्या तक्रारी सुरू होतात. म्हणून तुमच्या आनंदाच्या क्षणी विरजण घालणार्‍या आजारांवर नियंत्रण राखण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

चक्कर येणे : कार, जहाज, विमान किंवा ट्रेनमध्येसुद्धा यात्रा केल्याने अनेकांना चक्कर येते. उलट्यासुद्धा होतात. यासाठी
विशिष्ट प्रकारच्या गोळ्या आहेत. त्या तुम्ही सोबत ठेवू शकता. चक्कर थांबवण्यासाठी प्रवासात कमी जेवावे. कारमध्ये बसल्यावर आजूबाजूला न बघता मान ताठ ठेवून समोर बघावे. मुलांनासुद्धा हे शिकवायला हवे. आपल्या सोबत पाणी व लिंबू अवश्य ठेवावे.

घामोळ्या : जास्त उन्हात राहिल्यामुळे घामोळ्यांचा त्रास जाणवतो. त्यासाठी सिंथेटिक कापड्यांऐवजी सुती कपडे घाला. घामोळ्या निघाल्यावर उन्हात जाणे टाळावे. थंड पाण्याने अंघोळ करावी व यासाठी विशेष प्रकारचे पावडर येतात त्याचा वापर करावा. कॅलामाइन लोशनमुळे आराम मिळतो.

ऊन लागणे : प्रवासात 'लू' पासून बचाव करणे फारच गरजेचे आहे. छत्री घेऊन किंवा डोके झाकूनच बाहेर निघावे. पाणी भरपूर प्यावे. तरीही ऊन लागले तर शरीराला थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. संपूर्ण शरीराला थंड पाण्याने स्पंज करावे किंवा रोग्याला पाण्याच्या टबमध्ये बसवून पंखा सुरू करावा. 'लू' लागल्यास पाणी भरपूर प्यायला पाहिजे. लहान मुलांना ऊन लागल्यास त्यांना डिहाइड्रेशनचा धोका असतो म्हणून त्यांना लगेचच डॉक्टरला दाखवावे.

जखमा/ व्रण : चालता चालता पायाला चप्पाल चावली (जखम झाली) तर ती फारच त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच कधीही नवीन जोडे-चपला घालून प्रवासात जाऊ नये. जोड्यांना आधीच घालून त्याची सवय करून घ्यावी. चामडी कडक झाली असेल तर तिथे जखम होऊ शकते, म्हणून आधीच त्या जागेवर बँडेड लावायला पाहिजे.

एलर्जी : जागा व हवामानत बदलल्यामुळे बर्‍याचदा एलर्जी होण्याची शक्यता असते. तुमच्यावर एखाद्या वस्तूचे रिएक्शन होत असेल तर डॉक्टरचा सल्ला घेऊन त्याची गोळी नेहमी आपल्या जवळ ठेवावी. शरीरावर दाण्याच्या स्वरूपात एलर्जी होत असेल तर कॅलामाइन लोशन लावायला पाहिजे किंवा थंड पाण्याने अंघोळ केल्यानेसुद्धा खाज व जळजळ कमी होते.

दात दुखी : अशावेली पेनकिलर खायला पाहिजे. दातात पोकळी झाली असेल तर लवंगांचे तेल त्या जागेवर लावल्याने दाताचे दुखणे कमी होण्यास मदत मिळते. हिरड्यांहून रक्त येत असेल तर ब्रश केल्यानंतर मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

डोळ्यांची देखरेख : प्रवासात उन्हाचा चष्मा अर्थात गॉगलचा वापर जरूर करावा.

झोप : प्रवासात भरपूर झोप घेणे गरजेचे आहे. त्यासाठी दिवसा तुम्ही आराम करू शकता. त्याने मागच्या प्रवासाचा थकवा दूर होतो आणि पुढच्या प्रवासासाठी शरीर व मन ताजेतवाने होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi