Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे पदार्थ पुन्हा गरम करून खाण्यास घातक

हे पदार्थ पुन्हा गरम करून खाण्यास घातक
अनेकदा जेवण झाल्यानंतर बरंच जेवण वाचतं. मग ते वाया जाऊ नये म्हणून आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो आणि पुन्हा गरम करून खातो. 
 
पण काही पदार्थ असे आहेत जे पुन्हा गरम करून खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
webdunia
चिकन : चिकन पुन्हा गरम करून खाणे हानिकारक ठरू शकते. चिकन पुन्हा गरम केल्याने त्यामधील प्रोटीन कॉम्पोजिशन बदलतं. त्यामुळे पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
webdunia
बटाटा : बटाट्याचे पदार्थ बनवून झाल्यानंतर काही वेळाने त्यातील पोषकतत्त्व निघून जातात. याला पुन्हा गरम करून खाल्ल्यानंतर त्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो.
webdunia
मशरूम : मशरूम हे नेहमी फ्रेश असतानाच खाल्लं पाहिजे. यामध्ये प्रोटीन असतात, पण गरम केल्यानंतर या प्रोटिन्सचा कॉम्पोजिशनमध्ये रूपांतर होतं आणि त्याच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होतो.
webdunia
अंडी : अंडी देखील पुन्हा गरम करून खाल्ल्याने नुकसानकारक ठरू शकतं. अंड्यामधील प्रोटीन पुन्हा गरम केल्याने त्याचं विषात रूपांतर होतं.
webdunia
पालक : पालक पुन्हा गरम करून खाणे हे कॅन्सरला आमंत्रण असू शकतं. पालक पुन्हा गरम करून खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुम्हालाही ऑफिसमध्ये झोप येते का ?