Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केस गळतीमुळे परेशान आहात, तर हे 5 आयुर्वेद‌िक उपाय करून पहा

केस गळतीमुळे परेशान आहात, तर हे 5 आयुर्वेद‌िक उपाय करून पहा
, बुधवार, 19 ऑगस्ट 2015 (15:34 IST)
निरंतर केस गळत असल्यामुळे तुम्ही तणावात राहत असाल तर आयुर्वेदात याचे प्रभावी उपचार तुम्हाला नक्की मिळेल.   
 
बर्‍याच हर्बल वस्तू आहेत ज्यांच्या प्रयोगामुळे केसांचे गळणे आपण कमी करू शकतो. जाणून घ्या, आयुर्वेदाच्या आधारावर पाच सोपे उपाय जे केसांची गळती कमी करू शकतात.  
 
भृंगराज
webdunia
मजबूत आणि दाट केसांसाठी आयुर्वेदात भृंगराजचे फार महत्व आहे. भृंगराज तेलामुळे फक्त टक्कलच पडणे कमी होते बलकी वेळेआधी केसांना पांढरे होण्यापासून ही बचाव होतो

ब्राह्मी
webdunia
ब्राह्मी आणि दहीचे पॅक तयार करून केसांवर लावल्याने केसांचे गळणे कमी होईल. ब्राह्मीच्या तेलाने न‌ियम‌ित मसाज केल्यामुळे देखील केस दाट होतात.

आवळा
webdunia
 
आवळ्यात व्हिटॅमिन सी आणि एंटीऑक्सीडेंट्स भरपूर मात्रेत आहे जे केसांची वाढ करण्यास मदत करतात. आवळ्यात हिना, ब्राह्मी पाउडर व दही मिसळून पॅक तयार करून केसांवर लावावे.

कडूलिंब
webdunia
 कडू लिंबाच्या प्रयोगाने केस फक्त दाटच होत नाही तर त्यामुळे कोंडा व ऊवांची समस्या देखील दूर होते. कडूलिंबाच्या पानांचे पावडर तयार करून घ्या. त्यात दही किंवा नारळाचे तेल मिसळून मसाज करायला पाहिजे.

रीठा
webdunia
रीठ्याच्या प्रयोगाने केसं काळे आणि दाट होतात. रीठा पावडरमध्ये तेल मिसळून डोक्याची मसाज केल्याने केसांची गळती थांबते.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi