Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जाणून घ्या ‘आहळीवा’चे उपयोग

benefits of Garden Cress
आळीव किंवा आहळीव असे याला म्हणतात. याचे अनेक औषधी उपयोग आहेत. 
उचकी लागली असता – सतत सारखी उचकी लागली असता आळीव उचकी ताबडतोब थांबविते. 20 ग्रॅम आळीव जे तांबडसर बारीक बियासारखे असते ते पाव लिटर पाण्यात भिजत घालावे व ते पाणी चांगले दाट झाल्यावर, उचकी लागलेल्या माणसास वरचेवर पिण्यास द्यावे. याने उचकी थांबते.
 
लघवी साफ होण्यासाठी –
आळीव भिजवलेले चांगले दाट पाणी प्यायल्याने लघवीस साफ होते.
बाळंतीणीला चांगले दूध यावे म्हणून बाळंतिणी स्त्रीस दूध सुटण्यासाठी आहाळीवाची खीर देतात
 
शक्‍तीवर्धक –
शक्‍ती येण्यासाठी आळीवाची खीर बाळंतीणीला तसेच लहान मुलांना तसेच अशक्‍त माणसांना द्यावी.त्यामुळे शक्‍ती वाढते. ही खीर करण्याची विशिष्ट पद्धत आहे ती अशी, पाव लिटर दूध व पाव लिटर नारळाचे दूध घेऊन मंदाग्नीवर उकळत ठेवावे. उकळी फुटली म्हणजे त्यात 30 ग्रॅम भिजवलेले आळीव घालून व तितकाच आयुर्वेदिक गूळ घालून चांगले दाट होईपर्यंत मिश्रण ढवळावे. दाट झाल्यावर उतरवावे. थंड झाल्यावर ही खीर द्यावी.पुष्टतेसाठी म्हणजे शक्ती येण्यासाठी आळीवाचे लाडू करून खातात.
 
वातहारक –
वाताने कंबर दुखत असल्यास आळीवाची खीर खाल्ल्याने फायदा होतो.
 
स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारीवर –
आळीवाची खीर किंवा लाडू अत्यंत उपयुक्‍त आहे. जे हार्मोनल समतोल राखण्यास मदत करतात.
अशाप्रकारे आळीव हे अत्यंत उपयुक्‍त आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या वस्तू फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही