कांदा जवळ जवळ प्रत्येक भाजीत घालतात. याला सॅलड म्हणून कच्चं देखील खलले जाते. पातीचा कांदा आणि कोरडा दोन्ही प्रकारे वापरले जातात. नक्कीच कांद्याचा वापर केल्याने जेवणाची चव वाढते, परंतु हे निव्वळ जेवणाला रुचकरच करीत नाही तर यामधील असे अनेक घटके असतात, जे शरीरास पोषण देतात आणि बऱ्याच आजारांमध्ये औषध म्हणून ही काम करतात. हे अन्नाचे पचन करण्यास मदत करत. शरीराची ताकद वाढवतं.हे एक चांगले रक्तविकार नाशक देखील असे.
* रक्त विकारास दूर करण्यासाठी 50 ग्रॅम कांद्याच्या रसात 10 ग्रॅम खडीसाखरांत 1 ग्रॅम भाजलेले पांढरे जिरे मिसळून घ्या.
* बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी जेवणात दररोज एक कच्चा कांदा खावा. अपचनाची तक्रार असल्यास कांद्याचे बारीक बारीक तुकडे करून त्यावर लिंबू पिळावं किंवा व्हिनेगर घाला आणि जेवणात घ्यावं.
* मुलांना अपचन झाल्यास कांद्याच्या रसाचे तीन ते चार थेंब चाटवावे त्याने नक्कीच फायदा होतो. अतिसार झाल्यामुळे एक कांद्याला वाटून रुग्णाच्या नाभीवर लेप लावा किंवा कपड्यावर पसरवून नाभीवर बांधून द्या.
* कॉलऱ्यामध्ये उलटी अतिसार झाल्यावर दर एक एक तासाने रुग्णाला कांद्याच्या रसात थोडंसं मीठ टाकून प्यायला दिल्याने रुग्णाला आराम मिळतो. दर 15-15 मिनिटाच्या अंतरावर 10 थेंब कांद्याचा रस किंवा 10 -10 मिनिटाने कांदा आणि पोदिनाच्या 1-1 चमचा रस पाजल्याने कॉलेरापासून आराम मिळतो.
* कॉलरा झाल्यास सावधगिरी म्हणून एक ग्लास सोडाच्या पाण्यामध्ये एक ग्लास कांद्याचा रस, एक लिंबाचा रस, थोडंसं मीठ, काळे मिरे, आणि थोडंसं आल्याचा रस मिसळून प्यायल्याने पचन सुधारेल आणि कॉलरचा त्रास होणार नाही.
* 1 लीटर पाण्यात बारा ग्रॅम कांद्याचे तुकडे टाकून काढा बनवून प्यायल्याने दिवसातून तीन वेळा नियमाने पाजल्याने मूत्राशी निगडित सर्व त्रास दूर होतात. या मुळे मूत्र व्यवस्थित होते व कोणताही त्रास जाणवत नाही.
* खोकला, श्वास, घसा आणि फुफ्फुसाच्या आजारासाठी व टॉन्सिल्ससाठी कांदा ठेचून वास घेणं फायदेशीर असतं. सर्दी देखील कांदा खाणं फायदेशीर असतं.
* काविळीच्या निदानासाठी देखील कांदा फायदेशीर असतो. या साठी आवळ्याच्या आकाराचे अर्धा किलो कांदे मधून कापून व्हिनेगर मध्ये टाकून ठेवावे व त्यात थोडं मीठ आणि काळे मिरे देखील टाकून ठेवावं. दररोज सकाळ संध्याकाळ एक कांदा खाल्ल्याने कावीळ नाहीशी होणार.
* कांदा बारीक वाटून तळपायाला लावल्याने उष्माघातापासून होणाऱ्या डोकेदुखी मध्ये फायदा होतो.
* कान वाहत असल्यास, त्यामध्ये वेदना किंवा सूज आल्यावर कांद्याला जवसाच्या तेलात शिजवून दोन दोन थेंब अनेकदा कानात घातल्याने आराम मिळतो. शरीराचा कोणताही भाग भाजला असल्यास त्वरित कांदा ठेचून बाधित भागावर लावावा.