* भाताच्या पाण्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे तुमच्या शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते.
* भातामध्ये ओरिजेनॉल नावाचे तत्त्व आढळते. हे तत्त्व त्वचेला सूर्याच्या यूव्ही किरणांपासून वाचवण्यासाठी मदत करते.
* अतिसाराचा (डायरिया) त्रास जाणवत असेल तर भाताचे पाणी पिणे फायदेशीर ठरते.
* गर्मीच्या दिवसांत घामाच्या माध्यमातून आपल्या शरीरातून पाणी बाहेर पडून 'डिहायड्रेशन' होण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांत भाताचे पाणी 'डिहायड्रेशन'पासून वाचवते.
* भाताच्या पाण्यात हिलिंगचे गुणधर्म असतात. त्यामुळे, छोट्या-मोठ्या संक्रमणापासून (इन्फेक्शन) तुम्ही दूर राहता.