Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ह्या घरगुती उपायांनी ताप पळवा

ह्या घरगुती उपायांनी ताप पळवा
ताप आल्यावर प्रत्येक वेळी डॉक्टरांकडील औषधांबरोबरच घरगुती उपाय देखील करावेत.
 
काय आहेत हे घरगुती उपाय…
–    तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो.
–   आल्याचा चहा घेतल्यानेही आराम मिळतो. याने तापासोबत कफही निघून जाईल.
–   तापात बेलफळाचं चूर्ण उपयुक्त ठरतं. बेलफळाचं चूर्ण पाण्यात घालून ताप उतरेपर्यंत घ्यावं.
–  सफरचंद, दूध, खिचडी, टोमॅटो सूप, आलं, लसूण, काळी मिरी, शेवगा, कारली या पदार्थांचा समावेश करावा.
–   कपभर उकळत्या पाण्यामध्ये मूठभर ताजी तुळशीची पानं टाका. हे मिश्रण ५-१० मिनिटे उकळू द्या. ते गाळून दिवसातून दोनदा प्या. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा काढा फायदेशीर ठरतो. यामुळे ताप कमी होतो.
–   तापकमी करण्यासाठी तुळशीचा रसदेखील फायदेशीर ठरतो. लहान मुलांसाठीदेखील हा उपाय सुरक्षित आणि फायदेशीर आहे. १०-१५ तुळशीच्या पानांना पाण्यासोबत मिक्सरमध्ये वाटावे. २-३ तासांनी तुळशीचा रस प्यावा. यामुळे ताप कमी होण्यास मदत होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिवाळीत खुलवा सौंदर्य