Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Home Remedies:गॅस आणि पोटफुगीच्या समस्येने हैराण आहात का? या घरगुती उपाय अवलंबवा

Home Remedies:गॅस आणि पोटफुगीच्या समस्येने हैराण आहात का? या घरगुती उपाय अवलंबवा
, सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (20:18 IST)
चुकीचे आहार आणि जीवनशैली मुळे पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतात, या मुळे पोटाशी संबंधित विविध समस्या उद्भवू लागतात. पोटात गॅस होणे, पोट फुगणे सारखे त्रास होऊ लागतात. कधी कधी गॅस आतड्यात अडकून बसते त्यामुळे पोटात दुखणे, मुरडा येणे, सूज येणे असे त्रास होतात. गॅसचा त्रास सतत होत असल्यास डायरिया आणि बद्धकोष्ठते सारखे त्रास वाढतात.  
 
गॅस आणि पोटफुगीची समस्या काही औषधांद्वारे बरी केली जाऊ शकते, परंतु आरोग्य तज्ञांच्या मते, ज्या लोकांना या प्रकारची समस्या कायम राहते त्यांनी इतर पर्यायांचा देखील विचार केला पाहिजे.औषधांच्या अतिसेवनामुळे आरोग्यास गंभीर समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय देखील गॅसच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावीपणे काम करतात. त्यांचा वापर करून तुम्ही पोटाच्या समस्यांपासून दूर राहू शकता. चला जाणून घेऊया अशाच काही सोप्या पण अतिशय प्रभावी उपायांबद्दल. ज्यांना अवलंबवून आपण या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.
 
1 ओव्याचे सेवन - गॅसच्या समस्येवर मात करण्यासाठी ओवा खाण्याचा सल्ला वडिलधाऱ्यांकडून दिला जातो. कारण अभ्यासातून असे दिसून आले आहे की ओव्यामध्ये थायमॉल नावाचे एक कंपाउंड असते जे गॅस्ट्रिक रस स्राव करण्यास   आणि पचनास मदत करते. ज्या लोकांना गॅस किंवा पोटफुगीची समस्या आहे त्यांनी दिवसातून एकदातरी एक चमचा ओवा कोमट पाण्यासोबत घ्याव्यात. 
 
2 ऍपल सायडर व्हिनेगर-ऍपल सायडर व्हिनेगर आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. पोट फुगणे किंवा गॅसची समस्या दूर करण्यासाठी देखील हा एक प्रभावी उपाय मानला जाऊ शकतो. कोमट पाण्यात एक किंवा दोन चमचे ऍपल सायडर व्हिनेगर मिसळून त्याचे सेवन केल्यास पोट चांगले राहण्यासाठी विशेषत: गॅस आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी विशेष फायदा होतो. ऍपल सायडर व्हिनेगर पोट हलके ठेवण्यास देखील उपयुक्त आहे. 
 
3 लिंबूपाणी-जरी वजन कमी करण्यासाठी लिंबूपाणी
पिणे चांगले मानले जाते , परंतु पोट फुगणे किंवा गॅसची समस्या दूर करण्यासाठी त्याचे आश्चर्यकारक फायदे देखील होऊ शकतात. लिंबूमध्ये संयुगे असतात ज्यामुळे हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होते, जे अन्नाचे पचन सुलभ करते. रोज सकाळी कोमट पाण्यासोबत लिंबू सेवन केल्याने गॅस आणि सूज कमी होण्यास मदत होते. 
 
4 जिरे पाणी-पोटाच्या सर्व समस्यांमध्ये जिऱ्याचे सेवन फायदेशीर मानले जाते. रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिणे हा एक उत्तम घरगुती उपाय असू शकतो ज्यांना पोटात अनेकदा गॅसची समस्या असते. जिऱ्यामध्ये अनेक आवश्यक संयुगे असतात जे लाळ ग्रंथींना उत्तेजित करून अन्नाचे चांगले पचन करण्यास मदत करतात. यासाठी 1-2 चमचे जिरे रात्री पाण्यात भिजत ठेवावे आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे. गॅस आणि पोटफुगीच्या समस्येवर हे खूप उपयुक्त मानले जाते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मास्क न लावणे पडू शकतं महागात, या लोकांना संसर्ग होऊ शकतो