Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Home Remedies : छातीत जमलेला कफ काढण्यासाठी हे प्रभावी घरगुती उपाय अवलंबवा

Home Remedies : छातीत जमलेला कफ काढण्यासाठी हे प्रभावी घरगुती उपाय अवलंबवा
, मंगळवार, 17 जानेवारी 2023 (14:16 IST)
हिवाळ्याचा हंगामात सर्दी-खोकल्याची समस्या सामान्य असते, सर्दी-खोकल्याच्या समस्येवर मात करण्यासाठी ते अँटी-बायोटिक औषधांची मदत घेतात. त्यामुळे सर्दी बरी होते, पण अनेकदा छातीत कफ जमा होण्याची समस्या उद्भवते. छातीत जमा झालेला कफ काढून टाकण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय आणि औषधे वापरली जातात. चला, जाणून घेऊया काही प्रभावी घरगुती उपाय, ज्याच्या मदतीने छातीत जमा झालेला कफ दूर होऊ शकतो.
 
1 आल्याचे सेवन-
आल्याचे औषधी गुणधर्म सर्वांनाच ठाऊक आहेत, सर्दी आणि फ्लूच्या समस्येमध्ये शतकानुशतके वापरले जात आहे. आल्याचे सेवन केल्याने छातीत जमा झालेला कफ आणि घसा खवखवणे यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. आल्यामध्ये अँटी इंफ्लिमेट्री  गुणधर्म असतात जे बॅक्टेरियाच्या संसर्गापासून आराम देण्यास मदत करतात. एक चमचा आल्याच्या रसामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळल्यास फायदा होईल किंवा लिंबाच्या रसात आल्याचे छोटे तुकडे मिसळून सेवन करा.
 
2 पुदिन्याचे तेल-
पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब गरम पाण्यात मिसळून वाफ घ्या, असे काही दिवस केल्याने छातीत जमा झालेला कफ बाहेर पडेल. घसा खवखवत असल्यावरही हे फायदेशीर आहे.
 
3 मध आणि काळी मिरी  -
छातीत जमा झालेला कफ दूर करण्यासाठी मध आणि काळी मिरी यांचे सेवन गुणकारी आहे. काळी मिरी ही अँटी-बॅक्टेरियल आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचा उत्कृष्ट स्रोत आहे. एक चमचा काळी मिरी एक चमचा मधात मिसळून सेवन करा. छातीत साचलेला कफ काढून टाकण्यास तसेच घसादुखीपासून मुक्त होण्यास मदत होते. याच्या सेवनाने छातीत साचलेला कफ आणि घसादुखीपासून आराम मिळवण्यासाठी मदत होते.
 
4 कोमट पाण्याचे गुळणे करणे- 
हा खूप जुना पण प्रभावी उपाय आहे. कोमट पाण्यात थोडे मीठ मिसळा आणि दिवसातून दोन ते तीन वेळा गार्गल करा. यामुळे कफ आणि घसादुखी दोन्हीपासून आराम मिळेल.
 
5 काढा  प्या  -
लवंग, सुंठ, काळी मिरी, तमालपत्र, तुळस आणि दालचिनी यांचा काढा छातीत जमा झालेला कफ दूर करण्यासाठी गुणकारी आहे. लवंग, सुंठ, तमालपत्र आणि तुळस यांचा काढा  करून दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करा. यामुळे छातीत जमा झालेल्या कफच्या समस्येपासून लवकरच फायदा होईल. छातीत जमा झालेला कफ बाहेर काढून  प्रतिकारशक्ती मजबूत करेल.
 
Edited By - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Career in B.Tech in Fashion Technology: बीटेक इन फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम, शीर्ष महाविद्यालय, व्याप्ती ,पगार जाणून घ्या