हृदयरोग आणि हृदय विकाराच्या झटका येण्याचे सर्वात मोठे कारण आहे, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होणं. कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे, या नळ्या आतून अरुंद होतात आणि हृदयापर्यंत पुरेश्या प्रवाहाबरोबर रक्त पोहोचतच नाही. अधिक प्रमाणात चरबी साचल्यामुळे जेव्हा या नळ्या बंद होऊ लागतात आणि रक्त हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो.
आपण देखील उच्च कोलेस्टेरॉलचे रुग्ण असल्यास आणि बायपास शस्त्रक्रिया किंवा अँजिओप्लास्टी करायची नसल्यास, या घरगुती औषधाचा वापर आपणास मदतशीर ठरेल. हे हृदयाच्या नळ्यांमधून कोलेस्टेरॉल कमी करण्यात उपयुक्त ठरेल.
हे औषध कसं बनवायचे आहे, जाणून घ्या.
हे औषध बनविण्यासाठी आपल्याला या 5 गोष्टी लागणार आहेत.
1 कप लिंबाचा रस.
1 कप आल्याचा रस.
1 कप कांद्याचा रस.
3 कप मध.
1 कप सफरचंद व्हिनेगर.
हे लक्षात ठेवावं की सफरचंद व्हिनेगर घरातच बनवलेले असले पाहिजे किंवा पूर्णपणे नैसर्गिक असावं.
कृती -
वरील नमूद केलेले चारही रस एकत्र करावं आणि एका भांड्यात मंद आचेवर ठेवावं. किमान अर्धा ते एक तास शिजवून जेव्हा हे मिश्रण 3 कप शिल्लक राहील तेव्हा हे मिश्रण गॅस वरून काढून थंड होण्यासाठी ठेवावं. हे मिश्रण थंड झाल्यावर या मध्ये 3 कप मध मिसळा. आता या मिश्रणाला एखाद्या बाटलीत भरून द्या.
दररोज सकाळी उठल्यावर अनोश्यापोटी 1 चमचा या औषधाचे सेवन करावं. जरी आपल्याला याची चव आवडली नसल्यास तरी ही याचे नियमानं सेवन केल्यानं आपल्या हृदयाला सुरक्षित ठेवून आपल्या आयुष्याला वाचविण्यात उपयोगी ठरेल आणि आपण बायपास शस्त्रक्रिया किंवा अँजियोप्लास्टी टाळता येऊ शकेल.