Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Home Remedies : रात्र भरात गुडघेदुखी गायब होणार,फक्त हे देशी उपाय करून बघा

Home Remedies : रात्र भरात गुडघेदुखी गायब होणार,फक्त हे देशी उपाय करून बघा
गुडघेदुखीच्या होणाऱ्या त्रासापासून आजच्या काळात वृद्धच नव्हे तर आजची तरुणपिढी देखील त्रस्त आहे. जे लोकं या समस्याने त्रस्त आहेत त्यांच्यासाठी हा लेख फायदेशीर असू शकतो.
 
वाढते वय आणि रोजची जीवनशैली मध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमुळे आपल्या शरीरात वेगवेगळे बदल होतात. परिणामी, बरेच प्रकाराचे आजार आणि आरोग्याच्या तक्रारी देखील शरीरास बळी पाडतात यामध्ये गुडघ्याचे दुखणे प्रामुख्याने आहे. गुडघेदुखीची समस्या मुख्यतः वृद्धांमध्ये जास्त दिसून येते, तर खेळाडूंना देखील या समस्येचा सामना करावा लागतो.
 
अशा लोकांसाठी इथे एक देशी उपायाबद्दल सांगत आहोत. जे आपल्या गुडघ्यामधील होणाऱ्या वेदनेला कमी करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करू शकते. चला आज आम्ही इथे आपल्याला काही देशी उपायांबद्दल संपूर्ण माहिती देत आहो.
 
गुडघ्याचे दुखणे का होते?
 
या देशी उपायाला जाणून घेण्याच्या पूर्वी आपल्याला हे जाणून घेणे जरुरी आहे की आपल्या पायामधील होणाऱ्या वेदनेचे प्रमुख कारण काय आहे? मुख्यतः म्हटले जाते गुडघ्यामधील दुखणे टेंडइनाइटिस, गाऊट, ऑस्टियोऑर्थराइटिस, बेकर्स सिस्ट, बर्साइटिस सारख्या वैद्यकीय परिस्थितीमुळे उद्भवते. 
 
या व्यतिरिक्त खेळाच्या दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे किंवा अपघातात पडल्यामुळे देखील गुडघेदुखीची समस्या होऊ शकते. खाली आपल्याला असेच 2 देशी उपाय सांगत आहोत जे सामान्यतः गुडघेदुखीची समस्या दूर करण्यात आपली मदत करू शकते.
 
1. सफरचंदाच्या सिरक्याचे सेवन करावं.-
सफरचंदाच्या सिरक्यात बरेच औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या आरोग्यासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध होतात.
 
एक चमचा सफरचंदाच्या सिरक्याला गरम पाण्याबरोबर घेतल्याने यामधील असलेले वेदनाशामक गुणधर्म आपल्या गुडघ्यात होणाऱ्या दुखापतीला दूर करण्यासाठी प्रभावी परिणाम दाखवू शकतात. आपण याच प्रकारे दिवसातून 2 वेळा याचे सेवन करू शकता. शक्य असल्यास जेवण्यापूर्वी हे सेवन करण्याचा प्रयत्न करा.
 
2 लिंबू आणि तिळाच्या तेलाचा वापर -
एक लिंबू घ्या त्याला कापून त्याचा रस काढून घ्या. आता 2 चमचे तिळाच्या तेलात लिंबाचे रस मिसळा आणि हळुवार हाताने आपल्या गुडघ्यावर या मिश्रणाची मॉलिश करा. रात्री झोपण्याच्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर म्हणजे मॉर्निंग वॉक जाण्याच्या पूर्वी आपण या देशी उपायाचा वापर करू शकता. लिंबूमध्ये असलेले अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म गुडघ्याची सूज कमी करून वेदनेला कमी करू शकतात.
 
टीप : रोगाच्या निदानासाठी दिलेल्या माहितीचा वापर तज्ज्ञांच्या सल्लाशिवाय करू नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बडीशेप खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, बायकांचे सर्व त्रास या मुळे दूर होतात