प्रत्येक घरात मेथीचा उपयोग होतो. मेथीची पाने आणि बीज या दोहोंचा वापर करुन पदार्थ स्वादिष्ट बनवला जातो. स्वाद वाढवण्यासाठी कसुरी मेथी पदार्थात वरुन वापरली जाते. ही मेथी थोडी कडवट असते पण त्यात अनेक औषधी घटक असतात. म्हणून रोजच्या आहारात कसुरी मेथीचा वापर करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला असतो. मधुमेहींसाठी मेथीचा वापर गुणकारी सिद्ध होतो. चमचाभर मेथीदाणे पाण्यासवे घेण्याचा नित्य नियम पाळल्यास मधुमेह नियंत्रित राहतो. याच पद्धतीने मेथीमुळे अॅपनिमिया दूर होण्यासही मदत होते. म्हणूनच मेथी, कसुरी मेथी आणि मेथ्या या तीनही प्रकारात मेथीचे सेवन करावे. कसुरी मेथीच्या सेवनाचे काही विशेष लाभ जाणून घेऊ.
* बाळाला स्तनपान देणार्याा महिलांनी कसुरी मेथीच्या वापराला प्राधान्य द्यायला हवे. यात असे काही गुणधर्म असतात जे दूध वाढण्यास मदत करतात. याच हेतूने आपल्याकडे बाळंतिणीला मेथ्यांचे लाडू खाण्यास दिले जातात.
* रजोनिवृत्तीच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. संप्रेरकांमध्ये असंतुलन निर्माण होत असते. या काळातील याशारीरिक बदलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कसुरी मेथीचे सेवन लाभदायक ठरते. शिवाय याचे कोणतेही दुष्परिणाम दिसून येत नाहीत.
* रक्तातील शर्करेचे योग्य प्रमाण राखण्यासाठीही कसुरी मेथी परिणामकारक सिद्ध होते. कसूरी मेथीमुळे टाइप-2 प्रकारचा मधुमेह नियंत्रित राहतो.
* कसुरी मेथीच्या सेवनाने पोटाच्या, गॅसेससंदर्भातील आणि आतड्यांच्या समस्या कमी होऊ शकतात. त्याबरोबर कोणत्याही अॅालर्जीचा धोका कमी होतो. कसुरी मेथीचे सेवन फुफ्फुसाच्या आरोग्यरक्षणासाठी लाभदायक सिद्ध होते.